राजस्थानमधील बाजार समित्या ओस; गहू उत्पादकांची खाजगी व्यापाऱ्यांना पसंती

साधारणतः या काळात गहू (Wheat Procurement ) खरेदी केंद्रावर मोठी लगबग असते. शेतकरी मोठ्या प्रमाणात आपला गहू हमीभावाने विकण्यासाठी बाजार समित्यांत घेऊन येत असतात. बाजार समित्यांच्या परिसरात आडत्यांची, व्यापाऱ्यांची, मजुरांची धावपळ सुरु असते. प्रत्यक्षात श्रीगंगानगर, हनुमानगड या राजस्थानमधील प्रमुख गहू उत्पादक (Wheat Producer) जिल्ह्यांत वेगळे चित्र दिसून आले आहे. या बाजारसमित्यांत ना मालाची आवक होते आहे ना कसली वर्दळ दिसून येत आहे.
Wheat Procurement
Wheat ProcurementAgrowon
Published on
Updated on

राजस्थानमधील शेतकऱ्यांनी आपला गहू (Wheat) थेट खाजगी व्यापाऱ्यांना विकण्यास प्राधान्य दिले आहे. इथे त्यांना किमान आधारभूत किंमतीपेक्षा (MSP) जास्त दर मिळाला आहे. त्यामुळे कृषी उत्पादन बाजार समित्यांमधील (Agricultural Produce Market Committee) गहू खरेदी प्रभावित झाली आहे.

पंजाबच्या सीमेला लागून असलेल्या श्रीगंगानगर, हनुमानगड या राजस्थानमधील जिल्ह्यांत बहुतांशी शेतकऱ्यांनी आपला गहू खाजगी व्यापाऱ्यांना विकला आहे. बाजार समित्यांमधील गव्हाची आवक घटली असून मोहरी आणि हरभऱ्याची आवकही रोडावली आहे.

Wheat Procurement
देशात यावर्षी विक्रमी ११३ लाख टन मोहरी उत्पादनाचा अंदाज

इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. साधारणतः या काळात गहू (Wheat Procurement ) खरेदी केंद्रावर मोठी लगबग असते. शेतकरी मोठ्या प्रमाणात आपला गहू हमीभावाने विकण्यासाठी बाजार समित्यांत घेऊन येत असतात. बाजार समित्यांच्या परिसरात आडत्यांची, व्यापाऱ्यांची, मजुरांची धावपळ सुरु असते.

शेतकरी आपला माल विकून मोकळे होण्याच्या ओढीने धावपळ करत असतात. प्रत्यक्षात श्रीगंगानगर, हनुमानगड या राजस्थानमधील प्रमुख गहू उत्पादक (Wheat Producer) जिल्ह्यांत वेगळे चित्र दिसून आले आहे. या बाजारसमित्यांत ना मालाची आवक होते आहे ना कसली वर्दळ दिसून येत आहे.

Wheat Procurement
यंदा देशात गव्हाचे विक्रमी उत्पादन होणार!

केंद्र सरकारने यंदा गव्हासाठी २०१५ रुपयांची किमान आधारभूत किंमत (MSP) जाहीर केली आहे. गहू उत्पादकांनी आपला गहू २२५० रुपये प्रति क्विंटल अशा दराने खाजगी व्यापाऱ्यांना विकला आहे. या व्यापाऱ्यांनी हा माल थेट आपल्या शेतातून उचलला असल्याने शेत ते बाजार समित्या दरम्यानचा सर्व खर्च वाचला असल्याचे गहू उत्पादक शेतकरी सांगतात.

राज-१४८२ या वाणाच्या गव्हाला खाजगी व्यापाऱ्यांनी २८०० रुपये प्रति क्विंटल असा दर दिला तर एचडी-३०८६ वाणाला २३०० रुपये क्विंटलचा दर दिला आहे. गव्हाला एमएसपीपेक्षा (MSP) जास्त दर तोही थेट शेतात मिळत असेल आणि मालाची चढ-उतार, वाहतूक खर्च वाचणार असेल तर सरकारी खरेदी केंद्रावर का जायचे ? असा सवाल मांगीलाल बिष्णोई या गहू उत्पादक शेतकऱ्याने उपस्थित केला आहे.

Wheat Procurement
देशात विक्रमी अन्नधान्य उत्पादनाचा अंदाज  

या दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपली मोहरीसुद्धा (Mustard Crop) खाजगी व्यापाऱ्यांनाच विकली आहे. मोहरीला (Mustard Crop) सरकारने प्रति क्विंटल ५०५० रुपये एमएसपी (MSP) जाहीर केला आहे. शेतकऱ्यांनी खाजगी व्यापाऱ्यांना ६८०० रुपये प्रति क्विंटल दराने मोहरी विकली आहे.

चालू आर्थिक वर्षातील रब्बी विपणन हंगामातच हे चित्र अनुभवायला मिळते आहे. १५ मार्चपासून सरकारी खरेदी केंद्रावरील हमीभावाने खरेदी सुरु झाली आहे. बुधवारी (दिनांक २७ एप्रिल) हनुमानगड बाजार समितीत ६९४ टन गव्हाची आवक झाली होती. श्रीगंगानगर बाजार समितीत ३७ टन गहू विक्रीसाठी आला होता. गेल्या आर्थिक वर्षात या दोन्ही जिल्ह्यांतील गव्हाची खरेदी १ कोटी ३० लाख टनांवर असल्याचे बाजार समित्यांच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com