महाराष्ट्रातील २६ हजार लोक पीएम किसानसाठी अपात्र

केंद्र सरकारच्या पीएम किसान (PM Kisan) योजनेचा लाभ घेणारी महाराष्ट्रातील तब्बल २६ हजार लोक योजनेसाठी अपात्र असल्याचे समोर आले आहे.
PM Kisan
PM KisanAgrowon
Published on
Updated on

केंद्र सरकारच्या पीएम किसान (PM Kisan) योजनेचा लाभ घेणारी महाराष्ट्रातील तब्बल २६ हजार लोक योजनेसाठी अपात्र असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या बँक खात्यांत जमा करण्यात आलेली ११ कोटी रुपयांची रक्कम वसूल करण्यात येणार असल्याचे स्थानिक प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अनेक प्रसारमाध्यमात यासंदर्भातील वृत्त प्रकाशित झाले आहे.

पीएम किसान (PM Kisan) ही केंद्र सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. रायगड जिल्ह्यातील (महाराष्ट्र) २६ हजार अपात्र लोकांची नावे या योजने अंतर्गत नोंदवण्यात आली होती. या योजने अंतर्गत ११ कोटी रुपयांचा निधीही त्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे. हा निधी लवकरच सरकारकडे हस्तांतरीत करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

PM Kisan
कृषी क्षेत्राने दिला अतिरिक्त १ कोटी लोकांना रोजगार!

रायगड जिल्ह्यातील २६,६१८ लोक या योजनेसाठी अपात्र असल्याचे समोर आले आहे. आजवर त्यांच्या बँक खात्यांमध्ये ११ कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. लवकरच ती परत केंद्र सरकारकडे वळवण्यात येणार असल्याचे रायगडचे तहसीलदार सचिन शेजल यांनी म्हटले आहे.

या २६,६१८ लोकांपैकी ४५०९ लोक आयकर (Income Tax) भरत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्याकडून ३.८१ कोटी रुपये येणे असून त्यातील २.२० कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.

PM Kisan
केंद्र सरकारकडून १३७ लाख टन गव्हाची हमीभावाने खरेदी

. २२,१०९ अपात्र लोकांकडून ७.६५ कोटी रुपये वसूल करायचे आहेत, त्यातील केवळ ३४.५४ लाख रुपयेच वसूल करण्यात आले असल्याचेही शेजल यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले आहे.

पीएम किसान सन्मान निधी योजना (PM Kisan Samman Nidhi Yojana) ही केंद्र सरकारची प्रमुख योजना आहे. या योजने अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना प्रति वर्षी ६ हजार रुपये देण्यात येतात. तीन समान हप्त्यात हे पैसे थेट संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यात येतात.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com