MSP Kharif 2023 : माॅन्सून वेशीवर; हमीभाव कधी जाहीर होणार

Monsoon Update : अंदमान निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत मोसमी वाऱ्यांनी मजल मारली. पुढील काही दिवसांमध्ये माॅन्सून देशात दाखल होईल.
MSP Kharif 2023
MSP Kharif 2023Agrowon
Published on
Updated on

Monsoon News : अंदमान निकोबार बेटांसह बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत मोसमी वाऱ्यांनी मजल मारली. पुढील काही दिवसांमध्ये माॅन्सून देशात दाखल होईल. पण अजूनही केंद्र सरकारने खरिपातील पिकांचा हमीभाव जाहीर केला नाही.

सरकारने लवकर हमीभाव जाहीर केल्यास पिकांचे नियोजन करता येते. त्यामुळे सरकारने तातडीने हमीभाव जाहीर करावा, अशी मागणी शेतकरी आणि शेतकरी नेते करत आहेत.

सरकार दरवर्षी खरिपातील १४ पिकांसाठी हमीभाव जाहीर करत असते. सरकारने हमीभाव खरिप लागवडीच्या आधी जाहीर केल्यास शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. सरकारने चांगली वाढ केलेल्या पिकाच्या लागवडीचे शेतकऱ्यांना नियोजन करता येते.

राज्यात खरिपातील महत्वाची पीकं म्हणून कापूस, सोयाबीन आणि तुरीला ओळखले जाते. यापैकी तुरीची बऱ्यापैकी लागवड आंतरपीक म्हणून केली जाते. पण सध्या कापूस आणि सोयाबीनचे भाव दबावात आहेत.

कापूस आणि सोयाबीनचे भाव हंगामातील निचांकी पातळीवर आहेत. सध्या कापसाच्या भावात १ हजार ५०० रुपयांची घट झाली. सध्या सरासरी ६ हजार ५०० ते ७ हजार रुपयांचा भाव मिळत आहे. हा भाव चालू हंगामातील सर्वात कमी ठरला. तर सोयाबीनच्या भावातही सध्या क्विंटलमागं जळपास ८०० रुपयांची नरमाई दिसून येत आहे. सध्या सोयाबीनला ४ हजार ६०० ते ५ हजार २०० रुपयांचा भाव मिळत आहे. हरभराही हमीभावापेक्षा किमान ५०० रुपयांनी कमी भावात विकावा लागत आहे.

MSP Kharif 2023
Monsoon Update 2023 : पुढील २४ तासात मॉन्सूनच्या वाटचालीस पोषक स्थिती; मॉन्सूनची अडखळलेली वाट मोकळी होणार

निवडणुकांमध्ये चांगल्या वाढीची अपेक्षा

पुढील काळात महाराष्ट्रासह काही राज्यांच्या आणि लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीतरी भरीव देण्याच्या नावाखाली सरकार हमीभावात चांगली वाढ करण्याची शक्यता आहे. सरकार यंदा हमीभावात चांगली वाढ करू शकते, असा अंदाज शेतीक्षेत्रातील जाणकार बोलून दाखवत आहेत.

महाराष्ट्रासाठी महत्वाच्या कापूस आणि सोयाबीनच्या हमीभावात यंदा चांगली वाढ दिसू शकते. पण सरकारने हमीभाव वेळेत जाहीर केल्यास शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो.

इतिहास काय?

खरिपाच्या लागवडीआधी हमीभाव जाहीर झाल्यास जास्त वाढ झालेल्या पिकांची लागवड शेतकऱ्यांना करता येते. पण सरकार गेल्या काही वर्षांपासून जून महिन्यातच हमीभाव जाहीर करते. मागील खरिपातील हमीभाव ८ जून रोजी जाहीर करण्यात आला होता.

तर २०२१-२२ मध्ये ८ जून आणि २०२०-२१ मध्ये १ जून रोजी हमीभाव जाहीर केला होता. २०१८-१९ मध्ये तर ४ जुलै रोजी हमीभाव जाहीर केले होते.

हमीभावाचा किती फायदा?

सरकारने उशीरा हमीभाव जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांना फारसा फायदा होत नाही. कारण सरकार कापूस, सोयाबीन, तूर, मूग आणि उडदाची हमीभावाने एकतर खरेदी करत नाही. सरकारच्या हमीभाव खरेदीचा केवळ ६ टक्के शेतकऱ्यांना फायदा होतो.

९६ टक्के शेतकरी यापासून वंचित राहतात. दुसरे म्हणजे हमीभावामुळे बाजाराला आधार मिळालाच तर उशीरा हमीभाव जाहीर होत असल्याने शेतकऱ्यांना त्या पिकांची लागवड करता येत नाही. म्हणजेच सरकार केवळ नावासाठीच हमीभाव जाहीर करते की काय? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करत आहेत.

MSP Kharif 2023
Monsoon Update : पावसाच्या आगमनाचे संकेत
सर्व देश फिरून आणि संसदेचे उद्घाटन करून झाले असतील तर पंतप्रधानांनी आता थोडं शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावं. माॅन्सून काही दिवासांमध्ये दाखल होईल. मात्र तरीही सरकारने हमीभाव जाहीर केले नाहीत. तसंही या हमीभावाचा केवळ ६ टक्के शेतकऱ्यांना फायदा होतो. पण शेतकऱ्यांना एक आशा असते. शेतकऱ्यांना खरचं फायदा द्यायचा असेल तर हमीभाव कायदा आणावा.
राजू शेट्टी, संस्थापक अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
सरकारी धोरणामुळे आधीच भाव पडले. सरकार मोठा गाजावाजा करत हमीभाव जाहीर करते पण लागवडी झाल्यावर. हमीभाव आधीच जाहीर केले तर आम्हाला पिकाचं नियोजन करता येईल.
बळीराम गाडेकर, शेतकरी, उमरी, जि. जालना
हमीभावामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळतो. पण यंत्रे, खते, बि-बियाणे, डिझेल- पेट्रोल, मजुरीचे दर वाढून उत्पादन खर्च वाढतो. ७ ते ८ वर्षात हा खर्च दुप्पट झाला. याचा विचार करून वेळेत हमीभाव जाहीर होणे गरजेचे आहे.
प्रकाश मतसागर, शेतकरी, जरुळ, जि. छत्रपती संभाजीनगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com