भारत बनेल भरडधान्य उत्पादनाचे आगार

भारतात सध्या ९ प्रकारच्या भरडधान्याचे उत्पादन घेतले जाते. प्रक्रियाउत्पादन उद्योग क्षेत्राच्या मदतीने भारत जगभरातील अनेक देशांची पोषक आहाराची गरज भागवू शकतो.
Coarse Grain
Coarse Grain
Published on
Updated on

भारत हा जगभरातील भरडधान्याचे (Coarse Grain) आगार बनू शकतो. शेतकरी-उत्पादक कंपन्या (FPO) त्यात निर्णायक भूमिका बजावू शकतात, असा विश्वास भारत सरकारने व्यक्त केला आहे. दुबईतील एक्सपो २०२० मधील केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयातर्फे आयोजित अन्न, कृषी आणि उपजीविका पंधरवाड्यात झालेल्या परिसंवादात भारताने हा विश्वास व्यक्त केला आहे.

भारतात सध्या ९ प्रकारच्या भरडधान्याचे उत्पादन घेतले जाते. प्रक्रिया उत्पादन उद्योग (Processing and Production Industry) क्षेत्राच्या मदतीने भारत जगभरातील अनेक देशांची पोषक आहाराची गरज भागवू शकतो. शेतकरी उत्पादक कंपन्या आणि कृषी तंत्रज्ञान क्षेत्रातील स्टार्टअप्स यांच्या समन्वयाने भारतीय भरडधान्य उत्पादनाला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market)अनन्यसाधारण स्थान मिळवून देता येणे शक्य असल्याचे कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अभिलक्ष लेखी यांनी नमूद केले आहे.  

हेही वाचा -  शेतीमध्ये ड्रोनचा वापर करायचाय ?​ भरडधान्याच्या आहारातील वापराने आरोग्याबाबतच्या अनेक समस्यांचे निवारण होऊ शकते.  लठ्ठपणा आणि कुपोषण या दोन समस्यांवर मात करता येते. व्हिटॅमिन, मिनरल्स, फायटोकेमिकल्सनी युक्त भरडधान्यांच्या आहारातील समावेशाने हायपर टेन्शन, क्लोन कॅन्सर (Clone Cancer) आणि हृदयविकार (Heart Attack) नियंत्रणात आणता येतो. संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्ष म्हणून साजरे करण्याचे आवाहन केले आहे. त्याचे औचित्य साधत भारत जगभरातील कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यात निर्णायक भूमिका बजावू शकणार असल्याचे प्रतिपादन न्यूट्रीहबचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. दयाकार राव यांनी केले आहे.    

व्हिडीओ पाहा -  शेतकरी उत्पादक कंपन्या  (FPO), स्वयंसहायता गट (Self-Help Groups) आणि सहकारी तत्वावर सक्रिय असलेल्या संस्थांना तंत्रज्ञानाची जोड देत एका अपचारिक चौकटीत आणता येईल, असा विश्वास नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी आंत्रप्रिनरशिप अँड मॅनेजमेंटचे (NIFTEM) संचालक सी.आनंद रामकृष्णन यांनी व्यक्त केला आहे.  

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com