Soybean Market
Soybean Marketagrowon

Soybean Market : सोयाबीनसह खाद्यतेल आयातशुल्क २० टक्के करा: सोपाची मागणी

सोयाबीनचे दर ८ हजार रुपयांवरून ५ हजार रुपयांपर्यंत कमी झाले. सरकारने खाद्यतेल आयातशुल्क कमी केल्यामुळं दरावर दबाव वाढला आहे.
Published on

Soybean Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या दरात मोठी घट झाली आहे. पण याही काळात भारताने आयातशुल्क कमी केलेले आहे. परिणामी स्वस्त आयात वाढून सोयाबीन आणि मोहरीच्या दरात मोठी घट झाली. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

त्यामुळे सरकारने सर्व प्रकारच्या खाद्यतेल आयातशुल्कात २० टक्क्यांपर्यंत वाढ करावी, अशी मागणी सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशनचे अध्यक्ष दाविश जैन यांनी केली.

सोपाचे अध्यक्ष दाविश जैन यांनी वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाच्या दरात मोठी घट झाली. सप्टेंबर २०२२ ते मार्च २०२३ या काळात आयात होणाऱ्या कच्च्या सोयाबीन तेलाच्या दरात ३१ टक्क्यांपर्यंत घट झाली.

सूर्यफुल आणि पामतेलाच्या दरातही एवढीच घट झाली. सोयातेलाच्या दरात घट झाल्याने याचा परिणाम सोयाबीन दरावरही जाणवत आहे. सोयापेंडचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात २० टक्क्यांनी कमी झाले. त्यामुळे देशातून सोयापेंड निर्यात घटत आहे.

Soybean Market
Soybean Market : देशातील सोयाबीन बाजार दबावात का आला?

``आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर कमी झाल्यानंतर देशात तेलबिया पिकांचेही दर कमी झाले,`` असेही जैन यांनी पत्रात म्हटले आहे. त्याचा परिणाम सोयाबीन आणि मोहरी दरावर जास्त जाणवत आहे.

सोयाबीनचे दर ८ हजार रुपयांवरून ५ हजार रुपयांपर्यंत कमी झाले. सरकारने खाद्यतेल आयातशुल्क कमी केल्यामुळं दरावर दबाव वाढला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर कोसळले होते. तरीही सरकारने आयातशुल्कात कपात केली. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे, असेही जैन यांनी स्पष्ट केले.

शुल्क २० टक्के करा

आंतरराष्ट्रीय बाजारात खाद्यतेलाचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाले. देशातील तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सर्व प्रकारच्या खाद्यतेल आयात शुल्कात २० टक्क्यांपर्यंत वाढ करावी. यामुळं दरात वाढ तर होणार नाही.

मात्र स्वस्तात होणारी आयात कमी होऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, असेही दाविश जैन यांनी म्हटले आहे.

दरात अशी झाली घट

आंतरराष्ट्रीय बाजारात मागील सहा महिन्यांमध्ये खाद्यतेल दर कमी झाले. १ सप्टेंबर २०२२ पासून आतापर्यंत कच्च्या सोयाबीन तेलाचे दर ३१.२३ टक्क्यांनी कमी झाले. कच्च्या सूर्यफुल तेलाचे दर ३२ टक्क्यांनी तर कच्च्या पामतेलाचे भाव ६ टक्क्यांनी घटले. तर अर्जेंटीनाच्या सोयापेंडच्या दरात २० टक्के नरमाई आली.

Soybean Market
Soybean Market : बाजारातील सोयाबीनची रोजची आवक का घटली? भाव वाढणार?
सोयाबीन आणि मोहरीचे दर सध्या कमी झाले आहेत. शेतकऱ्यांची ही पिके घेण्याची इच्छा कायम राहावी यासाठी सरकारने त्यांना चांगला दर मिळेल, याची काळजी घ्यावी. पण सध्याच्या परिस्थितीत राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील शेतकरी तेलबिया पिकांपासून दूर होण्याची शक्यता आहे.
दाविश जैन, अध्यक्ष, सोपा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com