कॉफी निर्यातीत ४२ टक्क्यांची वाढ

आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये भारतीय कॉफीची उच्चांकी निर्यात झाली असून पहिल्यांदाच कॉफी निर्यातीत एक अब्ज डॉलर्सची उलाढाल झाली आहे.
Coffee Export
Coffee ExportAgrowon
Published on
Updated on

आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये भारतीय कॉफीची उच्चांकी निर्यात झाली असून पहिल्यांदाच कॉफी निर्यातीत (Export Of Coffee) एक अब्ज डॉलर्सची उलाढाल झाली आहे. वाढलेले मालवाहतूक (Freight Rate) दर आणि रशिया-युक्रेन संघर्षाचा (Russia Ukraine War) निर्यातीवर परिणाम झाला आहे. अशी आव्हाने असतानाही भारातातून कॉफीची मोठ्या प्रमाणात निर्यात झाली आहे. बिझनेस लाईनने ही बातमी दिली आहे.

Coffee Export
वातावरणबदलाचा कॉफी, मधमाश्यांवरील परिणामांचा होतोय अभ्यास

मागील वर्षीच्या (२०२०-२१) ७३४.९८ दशलक्ष डॉलरच्या तुलनेत २०२१-२२ मध्ये १.०४२ अब्ज डॉलर्स किमतीची कॉफी निर्यात (Coffee Export) झाली आहे. त्यामुळे २०२१-२२ मध्ये कॉफीच्या निर्यातीत ४२ टक्के एवढी वाढ झाली आहे. रुपयाच्या स्वरूपात पाहिल्यास निर्यातीचा अंदाज ७७६६.७७ कोटी रुपये असा आहे. भारतातून या वर्षात ४.१९ लाख टन कॉफीची निर्यात झाली आहे, जी मागील वर्षीच्या ३.१० लाख टनांच्या तुलनेत ३५ टक्के अधिक आहे.

Coffee Export
जगातील कॉफी उत्पादनात वाढ

“सरकारने निश्चित केलेले महत्त्वाकांक्षी निर्यात उद्दिष्ट साध्य केले याचा आम्हाला आनंद आहे. वाणिज्य मंत्रालयाने आर्थिक वर्ष २०२२ साठी १.०७ अब्ज डॉलर्स निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले होते.'' असे कॉफी बोर्डाचे (Coffee Board) मुख्य कार्यकारी अधिकारी के.जी जगदीशा (KG Jagdisha) म्हणाले.

जगदीशा म्हणाले की, ब्राझील आणि कोलंबियामध्ये कमी पुरवठ्यामुळे कॉफीच्या किमती वाढल्या आहेत. तसेच गेल्या दोन वर्षांत भारतातील उत्पादनातही मोठी वाढ झाली आहे. निर्यातीतील अडथळे दूर करण्यासाठी आणि कॉफीला प्रोत्साहन देण्यासाठी कॉफी बोर्डाने अनेक देशांसोबत खरेदी-विक्री बैठक घेतल्या.

अनेक आव्हाने आणि आंतरराष्ट्रीय किमतींमधील वाढ आणि कोरोनानंतरची मागणी यामुळे निर्यातीत वाढ झाली आहे. निर्यात चांगली होऊ शकली असती, परंतु मालवाहतुकीचे वाढते दर, कंटेनरची कमतरता, पुरवठा साखळी समस्या आणि रशिया-युक्रेन संकटाचा परिणाम इन्स्टंट कॉफी सेगमेंटवर झाला, असे कॉफी एक्स्पोर्टर्स असोसिएशनचे (Coffee Exporters Association) अध्यक्ष रमेश राजा (Ramesh Rajah) यांनी सांगितले.

दरम्यान, रशिया हा भारतीय इन्स्टंट कॉफीचा सर्वात मोठा खरेदीदार आहे. एकूण शिपमेंटपैकी सुमारे १५ टक्के वाटा हा रशियाचा आहे. रशिया-युक्रेन संघर्षामुळे इन्स्टंट कॉफीच्या निर्यातीवर परिणाम झाला असून निर्यातदारांना त्यांची देयके वसूल करण्यात समस्या येत आहेत. रशियन संकटाचा परिणाम एप्रिल-जून तिमाहीत जाणवेल, असेही राजा म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com