Onion Rate : दोन वर्षांपासून कांदा व्यापाऱ्याने थकवले शेतकऱ्यांचे पैसे

Onion Market : सिन्नर येथील बाजार समितीत विक्री केलेल्या कांद्याची रक्कम दोन वर्षे होऊनही व्यापाऱ्याने अद्याप दिलेली नाही.
Onion Rate
Onion RateAgrowon

Onion Update In Nashik : सिन्नर येथील बाजार समितीत विक्री केलेल्या कांद्याची रक्कम दोन वर्षे होऊनही व्यापाऱ्याने अद्याप दिलेली नाही. या प्रकरणाची चौकशी व्हावी, तसेच शेतकऱ्यांवर झालेल्या अन्यायाला सभापती डॉ. रवींद्र पवार यांनी पदभार स्वीकारताच वाचा फोडली.

त्यांनी माजी आमदार राजाभाऊ वाजे व संचालकांसमवेत उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील यांची मंगळवारी (ता. २३) भेट घेत निवेदन देेऊन शेतकऱ्यांची व्यथा मांडली. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या कांद्याची रक्कम लवकरात लवकर मिळावी, अशी मागणी त्यांनी केली.

येथील बाजार समिती मुख्य आवारामध्ये दीपक निवृत्ती तुपे या व्यापाऱ्याने १४४ शेतकऱ्यांकडून १ मार्च २०२१ च्या आसपास कांदा खरेदी केला. परंतु अद्याप शेतकऱ्यांची ४६ लाख ३४ हजार २५९ रुपयांची रक्कम अदा केलेली नाही.

बाजार समितीची बाजार फी ५ लाख १७ हजार ४७७ रुपये, शासकीय देखभाल फी २५ हजार ८९५ हजार व विलंब आकार ३ लाख ५५ हजार ८४८ रुपये, तसेच निवाड्याचे आदेशिका फी ५९ हजार ६११ रुपये असे एकूण ५५ लाख ९३ हजार ९० रुपये येणे आहेत.

Onion Rate
Onion Rate : कांदा निर्यातीत मोठी वाढ; दर दबावातच का?

शेतकऱ्यांचे कांद्याचे पैसे एक महिन्याच्या आत मिळवून देण्यासाठी योग्य ती तातडीची कारवाई करावी, अशा आशयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील यांना देण्यात आले. त्यांनी लवकरात लवकर व्यापाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आश्वासन दिले.

तहसीलदार एकनाथ बंगाळे, उपसभापती सिंधूबाई कोकाटे, संचालक शरदराव थोरात, नवनाथ घुगे, जालिंदर थोरात, श्रीकृष्ण घुमरे, सुनील चकोर, रवींद्र शेळके उपस्थित होते.

पैसे मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त

सद्यःस्थितीत कांद्याला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. दोन वर्षांचा कालावधी उलटूनही रक्कम मिळत नाही. थकित रक्कम मिळण्यासाठी शेतकरी बाजार समितीकडे तगादा करीत आहेत. बाजार आवारात अनेकदा गोंधळ निर्माण होऊन तणावाचे वातावरण निर्माण होते.

दैनंदिन कामकाजात अडथळा निर्माण होतो. खरीप हंगामाची लगबग सुरू होणार आहे. त्यासाठी मशागत, बि-बियाणे,कीटकनाशके, खते आदींसाठी भांडवलाची आवश्यकता भासत आहे. मात्र व्यापाऱ्याकडून पैसे मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी त्रस्त असल्याचे माजी आमदार वाजे, सभापती डॉ. पवार यांनी निदर्शनास आणून दिले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com