Cotton
CottonAgrowon

Cotton Dust Mite : कापसातील पिसवांमुळे शेतकरी बेजार

नव्या खरीप हंगामाचे वेध लागले असतानाच दरात सुधारणा होत नसल्याची स्थिती आहे. परिणामी शेतकरी दुहेरी विवंचनेत सापडला आहे.
Published on

Yavatmal News : दरवाढीच्या अपेक्षेने साठवणूक केलेल्या कापसात डस्ट माईटचा (पिसवा) प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी कुटुंबीयांना त्वचारोगांचा सामना करावा लागत आहे. अंगाला खाज सुटण्याचे प्रमाणही यामुळे वाढीस लागल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.

सिलिंडरचे भाव वाढले मात्र कापसाचे भाव केव्हा वाढणार, असा प्रश्‍न आज गावखेड्यात विचारला जात आहे. कापसाचे दर ७६०० रुपयांवर स्थिरावले आहेत. गेल्या हंगामाप्रमाणे कापसाचे दरात तेजी येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.

Cotton
Cotton Market : कापूस उत्पादनात आणखी घट; दर वाढतील का?

गेल्या हंगामात ११ हजार रुपयांपर्यंतचा दर कापूस उत्पादकांना मिळाला. यंदा मात्र उत्पादन खर्चाची भरपाई होण्याची शक्‍यता नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. दरवाढीची अपेक्षा असलेल्या शेतकऱ्यांनी घरातच कापसाची साठवणूक केली आहे.

परंतु नव्या खरीप हंगामाचे वेध लागले असतानाच दरात सुधारणा होत नसल्याची स्थिती आहे. परिणामी शेतकरी दुहेरी विवंचनेत सापडला आहे. अशातच घरात साठवलेल्या कापसात पिसवांचे प्रमाण वाढीस लागले आहे.

या पिसव्या चावा घेत असल्याने अंगावर पुरळ उठणे, खाज सुटणे अशा समस्यांना शेतकरी कुटुंबीय सामोरे जात आहेत.

Cotton
Cotton Market : कापूस विक्रीचं नियोजन यंदाही चुकलं का?
भाववाढीच्या अपेक्षेने कापसाची साठवणूक केली. परंतु दर तर तेजीत आले नाहीत मात्र साठवणूक केलेल्या कापसात पिसव्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यातूनच अनेक प्रकारच्या त्वचाविकारांना सामोरे जावे लागत आहे.
देवानंद राठोड, शेतकरी, उमरी, आर्णी, यवतमाळ
साठवणूक केलेल्या कापसावर क्‍लोरोसील २० टक्‍के इसीची फवारणी केल्यास पिसव्यांचे नियंत्रण बऱ्याच अंशी शक्‍य आहे. शेतकऱ्यांनी हा उपाय करावा.
गजानन बुक्‍कावार, संचालक गजानन कृषी सेवा केंद्र, आर्णी
जेथे धूळ किंवा तत्समस्थिती असते, अशा भागात पिसव्या कापूस किंवा अन्य सामानात लपून राहतात. हे अत्यंत सूक्ष्म असल्याने डोळ्याने दिसत नाहीत. त्यांच्यामुळेच त्वचेवर असे परिणाम दिसत आहेत. ही शेतातील नसून घरातील किड आहे.
डॉ. बाबासाहेब फंड, तज्ज्ञ, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com