Cotton Price
Cotton Price Agrowon

Cotton Rate : देशातील बाजारपेठेत आज कापसाचे दर स्थिर

आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात आज कापसाच्या दरात चढ उतार पाहायला मिळाले. आज सकाळच्या सत्रात कापसाचे दर नरमल्यानंतर सायंकाळी दरात काहीशी वाढ पाहायला मिळाली.
Published on

………….
अनिल जाधव
पुणेः देशातील बाजारात आजही कापसाची आवक (Cotton Arrivals) कमीच होती. कापूस दरात (Cotton Rate) मागील काही दिवसांपासून वाढ झाली. मात्र तरीही शेतकरी आणखी दरवाढीची वाट पाहत आहेत. तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात (Cotton Bhav) चढ उतार कायम आहेत.

आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात आज कापसाच्या दरात चढ उतार पाहायला मिळाले. आज सकाळच्या सत्रात कापसाचे दर नरमल्यानंतर सायंकाळी दरात काहीशी वाढ पाहायला मिळाली. कापसाचे वायदे दुपारी ४ वाजेपर्यंत ८५.९५ सेंट प्रतिपाऊंडवर पोचले होते. आंतरराष्ट्रीय कापूस बाजारात मागील काही दिवसांपासून चढ उतार सुरुच आहेत. त्याची प्रचिती आजही पाहायला मिळाली.


दुसरीकडे देशातील बाजारात आजही कापसाचे दर कायम होते. कापसाचा किमान दर ७ हजार ५०० रुपयांच्या पुढे गेला. तर सरासरी दरपातळी आता ८ हजार ५०० ते ९ हजार रुपयांच्या दरम्यान आहे. कमाल दर ९ हजार २०० रुपयांपर्यंत पोचला होता. मात्र बहुतांशी बाजारांमधील दर ९ हजार रुपयांपेक्षा कमीच आहेत.


देशातील बाजारात आजही कापसाची आवक मर्यादीतच राहीली. आज महाराष्ट्र, तेलंगणा आणि गुजरात राज्यात आवक काहीशी जास्त होती. आज महाराष्ट्रात कापसाला सरासरी ८ हजार ५०० ते ९ हजार रुपये दर मिळाला. तर सरकीचेही दर टिकून आहेत. सरकीच्या दरामुळे कापूस बाजाराला आधार मिळाला.

देशातील बाजारात सध्या सरकीला प्रतिक्विंटल सरासरी ३ हजार ५०० ते ४ हजार रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. सरकी तेल आणि सरकी पेंडेला मागणी असल्याने सरकीला उठाव मिळत आहे. तर सरकीच्या दरामुळे कापूस दराही टिकून आहेत.

…………….
काय आहे दरपातळी?
आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर कमी जास्त होत असताना देशातील दर टिकून आहेत. कापसाचे दर कमी झाल्यानंतर शेतकऱ्यांनी बाजारातील कापसाची आवक कमी केली होती. त्यामुळे कापसाचे दर सुधारले. मात्र आता दर सरासरी ८ हजार ५०० पुढे गेले तरी बाजारातील आवक कमीच आहे. परिणामी दरात सुधारणा दिसत आहे. यंदा कापसाचा सरासरी भाव ८ हजार ५०० ते ९ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान राहू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊन टप्प्याटप्प्याने कापसाची विक्री करावी, असे आवाहन कापूस बाजारातील अभ्यासकांनी केले.

Cotton Price
Cotton Market : ‘स्मार्ट’अंतर्गत कापसापासून रुई निर्मिती प्रक्रियेस सुरुवात

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com