Cotton Market : बाजारातील कापूस आवक स्थिरावली; दरपातळी काहिशी सुधारली

आज महाराष्ट्रातील बाजारात ४० हजार गाठी कापसाची आवक झाली होती. तर गुजरातमध्ये ४२ हजार गाठी कापूस बाजारात आला.
Cotton
CottonAgrowon

Cotton Market Rate : देशात कापूस बाजार (Cotton Market) मागील काही दिवसांपासून नरमला होता. त्यामुळं शेतकरी अडचणीत आले होते. दुसरीकडे उन्हाचा चटका वाढल्यानं शेतकरी कापूस विक्रीही वाढवत आहेत.

कापसाची आवक (Cotton Arrival) सध्या काहिशी वाढलेली दिसते. पण कापूस दरात (Cotton Rate) सुधारणा दिसली. कापसाच्या दरात आज क्विंटलमागं १०० ते २०० रुपयांची वाढ झाली होती.

देशातील बाजारात कापूस आवक (Cotton Arrival) स्थिर दिसतेय. मागील काही दिवसांपासून कापूस आवक सरासरी दीड लाख गाठींच्या दरम्यान होतेय. दुसरीकडे कापसाचे भाव (Cotton bajarbhav) मागील दोन महिन्यांतील निचांकी पातळीवर पोचले होते.

अनेक बाजारांमध्ये कमाल भावही ७ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान होता. पण आज बहुतेक बाजारांमध्ये सोयाबीन दरात सुधारणा दिसून आली. कापसाच्या दरात आज क्विंटलमागं १०० ते २०० रुपयांची वाढ झाली होती.

Cotton
Cotton Rate : खानदेशात कापूस दर ७७०० ते ८००० रुपये

बाजारात दर कमी होऊनही कापूस आवक स्थिर दिसली. कापसाची वेचणी पूर्ण झाली. तसंच उन्हाचा कडाका वाढल्यानं कापूस साठवण्याची समस्या अनेक भागात आहे. तसचं तीन-चार वेचण्या झाल्यानं एकदाच कापूस विक्रीलाही शेतकरी पसंती देत आहेत. त्यामुळंही बाजारातील आवक जास्त दिसत असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं.

बाजारातील कापूस आवक

आज देशातील बाजारात १ लाख ५३ हजार गाठी कापसाची आवक झाली होती. महाराष्ट्रातील आवक काहिशी घटली.

आज महाराष्ट्रातील बाजारात ४० हजार गाठी कापसाची आवक झाली होती. तर गुजरातमध्ये ४२ हजार गाठी कापूस बाजारात आला. तेलंगणातील शेतकऱ्यांनी २७ हजार गाठी कापूस विकला.

कापूस, रुई, पेंडेचे दर

दराचा विचार करता, आज अनेक बाजारांमध्ये किमान दरात क्विंटलमागं १०० ते २०० रुपयांची सुधारणा दिसली. सरासर दरपातळी मात्र आजही कायम होती. कापसाला आज सरासरी ७ हजार ९०० ते ८ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळाला.

तर रुईच्या खंडीचे भाव आज ६१ हजार ते ६३ हजार रुपयांच्या दरम्यान होते. एक कापूस खंडी ३५६ किलो रुईची असते. सरकीचे दर आज ३ हजार १०० ते ३ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान होते. तर सरकी ढेप २ हजार ७०० ते ३ हजार १०० रुपयाने विकली गेली.

Cotton
Cotton Rate : पांढऱ्या सोन्याला मिळतोय कवडीमोल भाव

काय राहू शकते दरपातळी?

देशात कापसाचा वापर सध्या वाढला आहे. सुतगिरण्याही अधिक क्षमतेने काम करत आहेत. बांगलादेश, चीन आणि इतर देशांना कापूस निर्यात सुरु आहे. त्यामुळं पुढील काळात कापसाचे दर सुधारण्यास अनुकूल स्थिती आहे. परिणामी कापसाचे दर सुधारतील.

त्यामुळं शेतकऱ्यांनी कापसासाठी ८ हजार ५०० रुपयांचे टार्गेट ठेवण्यास हरकत नाही. बाजारातील कापसाची आवक कमी झाल्यास दरात आणखी सुधारणा होऊ शकते. त्यामुळं शेतकऱ्यांनी बाजाराचा आढावा घेऊनच कापसाची विक्री करावी, असं आवाहन कापूस बाजारातील अभ्यासकांनी केलंय.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com