Rice Export : बासमती तांदळाचे दर तेजीत; निर्यात वाढली

जागतिक तांदूळ उत्पादनात यंदा घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे तांदळाचे दरही ११ वर्षांतील उच्चांकी पातळीवर आहेत.
Rice Export raised
Rice Export raised Agrowon

पुणेः आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) तांदळाचा तुटवडा निर्माण होऊन दर तेजीत आहेत. त्यामुळे भारतातून बासमती तांदळाची निर्यात (Export Of Basmati Rice) वाढली.

चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते डिसेंबर या काळात बासमती तांदळाची निर्यात १७ टक्क्यांनी अधिक राहिली, असे अपेडाच्या माहितीवरून स्पष्ट होते.

जागतिक तांदूळ उत्पादनात (Rice production) यंदा घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे तांदळाचे दरही ११ वर्षांतील उच्चांकी पातळीवर आहेत. त्यामुळे भारतातून तांदूळ निर्यात वाढली आहे. बासमती तांदळाचा विचार करता निर्यातीत मोठी वाढ झाली.

चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तीन तिमाहींमध्ये म्हणजेच एप्रिल ते डिसेंबर या काळात बासमती तांदळाची निर्यात १७ टक्क्यांनी वाढली आहे.

भारताच्या एकूण निर्यातीपैकी तब्बल निम्मा तांदूळ इराण, सौदी अरेबिया आणि युएई या देशांमध्ये निर्यात झाला. विशेष म्हणजे बासमती निर्यातदारांना आंतरराष्ट्रीय बाजारात २० टक्के अधिक दर मिळाला.

Rice Export raised
Rice : आदिवासींना मिळतोय भेसळयुक्त तांदूळ

निर्यात अशी वाढली

अपेडाच्या ताज्या आकडेवारीनुसार, एप्रिल ते डिसेंबर या काळात देशातून ३२ लाख टन बासमती तांदूळ निर्यात झाला. मागीलवर्षी याच काळातील निर्यात २७ लाख टनांवर होती. मुल्याचा विचार करता यंदा ४० टक्के वाढ झाली.

यंदा पहिल्या ९ महिन्यांमध्ये ३३४ कोटी डाॅलरचा बासमती तांदूळ निर्यात झाला. तर मागील हंगामातील निर्यातीचे मुल्य २३८ कोटी डाॅलरवर होते. रुपयात विचार करता निर्यातीचे मुल्य १७ हजार ६६४ कोटींवरून २६ हजार ५९१ कोटींवर पोचले. 

निर्यात सौदे

निर्यातदारांना एप्रिल ते सप्टेंबर या काळात बासमती तांदळाला सरासरी १ हजार ५७ डाॅलर प्रतिटनाचा दर मिळाला. यंदाही बासमती तांदळाचे दर जास्त राहतील, या आशेने निर्यातदारांनी चढ्या दराने खेरदी केली.

चढ्या दरात सध्या निर्यातीचे सौदे धीम्या गतीने होत आहेत. सध्या १ हजार १०० ते  १ हजार २०० डाॅलर प्रतिटनाने निर्यात सौदे होत आहेत. सध्या पाकिस्तानमध्ये आर्थिक समस्या सुरु आहे. त्यामुळे भारताच्या बासमती तांदळाला मागणी वाढली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com