Indian Rice: भारतातून तांदूळ आयातीसाठी बांगलादेशची धडपड

बांगलादेशने २२ जून रोजी एक अधिसूचना काढून ३१ ऑक्टोबरपर्यंत बिगर बासमती तांदूळ आयात करण्यास परवानगी दिली. भारतातून एवढ्या लवकर तांदूळ आयात (Rice Import) करण्याची बांगलादेशची ही पहिलीच वेळ आहे.
Indian Rice
Indian RiceAgrowon

(वृत्तसंस्था)

बांगलादेशने तांदळावरील आयात शुल्क (Import Duty) कमी केल्यामुळे भारतीय तांदळाचा (Indian Rice) भाव वधारला आहे. गेल्या पाच दिवसांत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय तांदळाचे दर १० टक्क्यांनी वाढले. बांगलादेशने तांदळावरील आयातशुल्क (Import Duty) ६२.५ टक्क्यांवरुन २५ टक्क्यांपर्यंत खाली आणले. त्यामुळे भारतातून बांगलादेशला तांदळाची निर्यात मोठ्या प्रमाणावर वाढण्याची चिन्हे आहेत.

बांगलादेशने २२ जून रोजी एक अधिसूचना काढून ३१ ऑक्टोबरपर्यंत बिगर बासमती तांदूळ आयात करण्यास परवानगी दिली. भारतातून एवढ्या लवकर तांदूळ आयात (Rice Import) करण्याची बांगलादेशची ही पहिलीच वेळ आहे. भारत लवकरच तांदळाच्या निर्यातीवर बंदी घालेल, अशी चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे बांगलादेशने ही घाई केल्याचे मानले जात आहे. एरवी बांगलादेश सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये तांदूळ आयात करायला सुरू करतो.

Indian Rice
Kharif Sowing : राज्यात खरीप पेरण्या वेगात

बांगलादेशात सध्या अन्नधान्याचा तुटवडा (Food Crisis) आहे. रशिया-युक्रेन युद्ध आणि भारताने गव्हाच्या निर्यातीवर घातलेली बंदी यामुळे बांगलादेशची गहू आयात घटली आहे. त्यामुळे गव्हाच्या पिठाचे दर भडकले आहेत. त्यातच यावर्षी पुरामुळे बांगलादेशातील भातशेतीचं मोठं नुकसान झालं.

पूर, वादळ आणि अतिवृष्टीमुळे भाताचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घटले. येत्या काळात अन्नधान्याची टंचाई (Food Crisis) आणखीनच वाढण्याची शक्यता आहे. म्हणून बांगलादेश तांदूळ आयातीसाठी घाई करत आहे. तांदळाची आयात वाढवण्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आयातशुल्कात (Import Duty)मोठी कपात करण्यात आली आहे.

Indian Rice
Tur Rate : यंदा तूर भाव खाणार का?

गेल्या पाच दिवसांत जागतिक बाजारात भारतीय बिगर बासमती तांदळाचे दर प्रति टन ३५० डॉलरवरुन ३६० डॉलरवर पोहोचले, असे राईस एक्सपोर्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष बी.व्ही. कृष्णा राव म्हणाले. बांगलादेशने आयातशुल्क (Import Duty) कमी केल्याचा हा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले.

बांगलादेश सर्वसाधारणपणे पश्‍चिम बंगाल, उत्तर प्रदेश आणि बिहारमधून तांदूळ खरेदी करतो. या तीन राज्यांमध्ये तांदळाचे भाव २० टक्क्यांनी वाढले आहेत. त्याचा परिणाम इतर राज्यांतही झाला. तिथे तांदळाच्या किमतींमध्ये १० टक्के वाढ झाली, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

बांगलादेशने २०२०- २१ मध्ये सुमारे साडे १३ लाख टन तांदळाची आयात (Rice Import) केली. बांगलादेश यंदा बिगर-बासमती तांदूळ लवकर खरेदी करणार असल्याने भारताच्या तांदूळ (Rice Export) निर्यातीला मोठी चालना मिळेल. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारताने २०२१-२२ मध्ये बिगर बासमती तांदूळ निर्यातीतून ६.११ अब्ज डालर्सचे उत्पन्न मिळवले. त्याच्या आधीच्या वर्षी या निर्यातीतून ४.८ अब्ज डॉलर्स मिळाले होते. तांदळाच्या जागतिक व्यापारात भारताचा वाटा ४० टक्क्यांहून अधिक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com