पंजाबमध्ये गहू खरेदीचे निम्मे उद्दिष्ट पूर्ण

राज्यात या रब्बी हंगामात ३५ लाख हेक्टर क्षेत्रात गव्हाची लागवड करण्यात आली. राज्यातील गव्हाचे उत्पादन १७१ लाख टनांवर जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Wheat Procurement
Wheat ProcurementAgrowon
Published on
Updated on

पंजाब सरकारने चालू रब्बी विपणन हंगामात अवघ्या २० दिवसांत गहू खरेदीचे (Wheat Procurement) निम्मे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. १ एप्रिलपासून सुरु झालेल्या गहू खरेदी प्रक्रियेत पंजाब सरकारने ६७.५० लाख टन गव्हाची (Wheat) खरेदी केली आहे.

गहू खरेदी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अवघ्या २० दिवसांत पंजाबमध्ये एवढा गहू खरेदी (Wheat Procurement) करण्यात आला आहे. पंजाबसाठी यंदा १३० लाख टन गहू खरेदी करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यातील ५० टक्के म्हणजेच ६७.५० लाख टन गहू खरेदी झाली असल्याचे सरकारी सूत्रांनी म्हटले आहे.

Wheat Procurement
यंदाच्या खरिपात १६३ दशलक्ष टन धान्य उत्पादनाचे उद्दिष्ट

या रब्बी हंगामात गेल्यावर्षीच्या तुलनेत २७ टक्के अधिक मालाची आवक झाली आहे. गेल्यावर्षी रब्बी हंगामात याच कालावधीत ५३.३५ लाख टन गव्हाची (Wheat) आवक झाली होती.

आजवर बाजारात दाखल झालेल्या गव्हापैकी ६१.९५ लाख टन गव्हाची खरेदी (Wheat Procurement) हमीभावाने (MSP) सरकारी खरेदी केंद्रांकडून करण्यात आली आहे. उर्वरित ३.४५ लाख टन गव्हाची खरेदी खाजगी यंत्रणांकडून करण्यात आली आहे.

राजाच्या कृषी विभागाकडील १९ एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार संगरूर जिल्ह्यातून सर्वाधिक ७.२७ लाख टन गव्हाची आवक झाली आहे. त्यातील ७.१८ लाख टन गव्हाची खरेदी (Wheat Procurement) करण्यात आली आहे. फेरोजपूर जिल्ह्यातून ५.४० लाख टन आणि पटियाला जिल्ह्यातून ५.३१ लाख टन गव्हाची आवक झाली आहे.

Wheat Procurement
भारताच्या बिगर बासमती तांदळाची निर्यात ६ अब्ज डॉलर्सवर!

राज्यात या रब्बी हंगामात ३५ लाख हेक्टर क्षेत्रात गव्हाची लागवड करण्यात आली. राज्यातील गव्हाचे उत्पादन १७१ लाख टनांवर जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान राज्य सरकारने खाजगी व्यापारी, कंपन्यांना बाजार समिती शुल्क भरल्यानंतरच शेतकऱ्यांकडून गहू खरेदी करण्याच्या सूचना केल्या आहेत.

बाजार समित्यांचे शुल्क भरल्याशिवाय कोणी गहू खरेदी करताना आढळल्यास मूळ शुल्काच्या दहा पट शुल्क दंड म्हणून नाकारण्यात येणार असल्याचेही सरकारी सूत्रांनी नमूद केले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com