Supari Import : भारतात सुपारीचा वापर वाढला; आयात दुपटीपेक्षा अधिक

भारताने चालू आर्थिक वर्षात सुपारीची आयात दुपटीहून अधिक केली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी नुकतेच यासंबंधीची माहिती संसदेत दिली.
Supari
SupariAgrowon

पुणेः भारतात चालू आर्थिक वर्षातील आठ महिन्यांत सुपारी (Supari) आयात जवळपास १३६ टक्क्यांनी वाढली. भारताला सर्वाधिक सुपारी पुरवठादार म्हणून म्यानमार पुढे आला आहे. भारताने ६१ हजार ४५२ टन आयात केली.

मात्र देशातील शेतकऱ्यांचे हीत जोपासण्यासाठी सुपारे किमान आयात मुल्य २५१ रुपये प्रतिकिलो निश्चित करण्यात आले, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल (Union Minister of State for Commerce and Industry Anupriya Patel) यांनी संसदेत दिली.

भारताने चालू आर्थिक वर्षात सुपारीची आयात दुपटीहून अधिक केली. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी नुकतेच यासंबंधीची माहिती संसदेत दिली.

मंत्री पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार देशात एप्रिल ते नोव्हेंबर या ८ महिन्यांमध्ये काळात ६१ हजार ४५२ टन सुपारी आयात झाली.

Supari
Crop Advice : जाणून घ्या आंबा, सुपारी पीक सल्ला

तर २०२१-२२ च्या संपूर्ण आर्थिक वर्षात २५ हजार ९७८ टन सुपारी देशात आयात झाली होती. म्हणजेच यंदाच्या पहिल्या ८ महिन्यांमध्येच सुपारी आयात १३६ टक्क्यांनी वाढली.

भारताने यंदा म्यानमारमधून सर्वाधिक सुपारी आयात केली. भारताला म्यानमार, श्रीलंका आणि इंडोनेशियाने यंदा सुपारी पुरवठा वाढवला. इतर देशांमधूनही भारताला सुपारी निर्यात झाली. मात्र म्यानमारचा वाटा सर्वाधिक आहे.

म्यानमारमधून तिप्पट आयात

२०२१-२२ च्या संपूर्ण हंगामात म्यानमारमधून ७ हजार ६४५ टन सुपारी आयात झाली होती. मात्र चालू वर्षातील पहिल्या ८ महिन्यांमध्येच २८ हजार ५८९ टन सुपारी आयात झाली. म्हणजेच म्यानमारधून होणारी आयात जवळपास तीनपटींपर्यंत वाढली.

मुल्याचा विचार करता म्यानमारमधून गेल्याहंगामात २ कोटी ७१ लाख डाॅलरची सुपारी भारतात आली होती. यंदा त्याचं मुल्य ९ कोटी ९५ लाख डाॅलरवर पोचले.

सुपारी किमान भाव निश्चित

देशात यंदा सुपारी आयात वाढली. मात्र देशातील सुपारी उत्पादकांचे हीत जोपासण्यासाठी सरकारने आयातीवर १०० टक्के शुल्क लावले आहे, असेही मंत्री पटेल यांनी सांगितले.

आयात होणाऱ्या सुपाचा भाव खर्च, विमा आणि वाहतुकीसह म्हणजेच सीआयएफ भाव २५१ रुपये प्रतिकिलोपेक्षा कमी असल्यास निर्यातीवर बंदी आहे. सराकरने आयात सुपारीचा किमान भाव २५१ रुपये प्रतिकिलो निश्चित केला आहे, असेही मंत्री पटेल यांनी संसदेत सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com