Cotton Rate : मानवतमध्ये कापूस ७६०० ते ८५२० रुपये

मानवत बाजार समितीत शुक्रवारी (ता. १३) कापसाची २००० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ७७०० ते कमाल ८४५५ रुपये तर सरासरी ८३०० रुपये दर मिळाले.
Cotton Price
Cotton Price Agrowon

परभणी ः जिल्ह्यातील मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीत (Manvat APMC) सोमवारी (ता. १६) कापसाच्या ७० ते ८० गाड्यांची आवक (Cotton Arrival) झाली. कापसाला (Cotton Rate) प्रतिक्विंटल किमान ७६०० ते कमाल ८५२० रुपये तर सरासरी ८४०० रुपयांपर्यंत दर मिळाला.

Cotton Price
Cotton Rate : कापूसदरात पडझड सुरूच

मानवत बाजार समितीत शुक्रवारी (ता. १३) कापसाची २००० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ७७०० ते कमाल ८४५५ रुपये तर सरासरी ८३०० रुपये दर मिळाले.

गुरुवारी (ता. १२) कापसाची २२०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७८०० ते कमाल ८५७५ रुपये तर सरासरी ८४०० रुपये दर मिळाले.

बुधवारी (ता. ११) कापसाची २४०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ७८०० ते कमाल ८६१० रुपये तर सरासरी ८४५० रुपयांपर्यंत दर मिळाले.

Cotton Price
Cotton Rate : कापूस, हरभरा, कांद्याची आवक स्थिर

मंगळवारी (ता. १०) कापसाची २४०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ८००० ते कमाल ८६६० रुपये तर सरासरी ८५५० रुपये दर मिळाले. सोमवारी (ता. ९) कापसाची ३३०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ८००० ते कमाल ८७१५ तर सरासरी ८६५० रुपये दर मिळाले.

सेलू बाजार समितीत सोमवारी (ता. १६) कापसाला प्रतिक्विंटल किमान ७८८० ते कमाल ८४०० रुपये तर सरासरी ८३२५ रुपये दर मिळाले.

शनिवारी (ता. १४) कापसाची ६१५ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ७४०० ते कमाल ८३२५ रुपये तर सरासरी ८२५० रुपये दर मिळाले.

गुरुवारी (ता. १२) कापसाची ६२० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ७७०० ते कमाल ८४०० रुपये तर सरासरी ८३५५ रुपये दर मिळाले.

सध्याच्या दरात कापूस विक्रीस पसंती

कापूस दरातील घसरण सुरूच असून किमान दर ८००० रुपयांपेक्षा कमी झाले आहेत. त्यामुळे दर १०००० किंवा त्यापेक्षा जास्त वाढतील या अपेक्षेने कापूस साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

दर आणखी कमी होऊन नुकसान सोसण्यापेक्षा सध्याच्या दरात कापूस विक्रीला अनेक शेतकऱ्यांनी पसंती दिल्यामुळे आवक वाढलेली दिसत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com