Cotton Rate : सेलू बाजार समितीत कापूस दर ७००० ते ९५३१

जिल्ह्यातील सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीत यंदाच्या खरेदी हंगामात शुक्रवारपर्यंत (ता. २४) एकूण १ लाख ११ हजार २०७ क्विंटल कापूस खरेदी झाली
Cotton Rate
Cotton RateAgrowon

Cotton Market Update परभणी ः जिल्ह्यातील सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीत (Selu APMC) यंदाच्या खरेदी हंगामात शुक्रवारपर्यंत (ता. २४) एकूण १ लाख ११ हजार २०७ क्विंटल कापूस खरेदी (Cotton Procurement) झाली. प्रति क्विंटल किमान ७००० ते कमाल ९५३१ रुपये दर मिळाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव राजीव वाघ यांनी दिली.

Cotton Rate
Cotton Market : कापूस दरवाढीला पोषक स्थिती असतानाही दबावातच का?

सोमवारी (ता. २७) कापसाला प्रति क्विंटल किमान ७४२५ ते कमाल ७९२० रुपये तर सरासरी ७८७० रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. २४) २४३३ क्विंटल आवक होऊन किमान ७४२० ते कमाल ८१२५ रुपये तर सरासरी ८०८० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. २३) २३०० क्विंटल आवक होऊन किमान ७८०० ते कमाल ८१६५ रुपये तर सरासरी ८१६५ रुपये दर मिळाले.

Cotton Rate
Varieties Of Cotton : कापसाच्या विविध जातींचा रंजक इतिहास माहितेय का?

सेलू बाजार समितीच्या मार्केट यार्डावर १९ नोव्हेंबरपासून जाहीर लिलावद्वारे कापूस खरेदी सुरू झाली. खरेदी मुहूतर्वर कापसाला प्रति क्विंटल कमाल ९५३१ रुपये दर मिळाला. त्यानंतर मात्र कापसाच्या दरात घसरण सुरू झाली.

सेलू बाजार समिती कापूस आवक स्थिती (आवक क्विंटलमध्ये)

महिना...आवक...किमान दर...कमाल दर रुपये

नोव्हेंबर...८७२४...८९६०...९५३१

डिसेंबर...२७२७१...७४००....९२८५

जानेवारी...३९७२५...७०००...८८७५

फेब्रुवारी...३३३३९...७०००...८४७०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com