Soybean Rate : हिंगोलीत सोयाबीन प्रति क्विंटल ४८०० ते ५२२६ रुपये

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारामध्ये (भुसार माल मार्केट) शनिवारी (ता. ४) सोयाबीनची ६०० क्विंटल आवक होती.
Soybean Rate
Soybean Rate Agrowon

Soybean Market News हिंगोली ः हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत (Hingoli APMC) धान्य बाजारामध्ये (भुसार माल मार्केट) शनिवारी (ता. ४) सोयाबीनची ६०० क्विंटल आवक (Soybean Arrival) होती. सोयाबीनला प्रति क्विंटल किमान ४८०० ते कमाल ५२२६ रुपये तर सरासरी ५०१३ रुपये दर (Soybean Rate) मिळाले.

हिंगोली बाजार समितीतील भुसार माल मार्केटमध्ये सोमवार (ता. ३० जानेवारी) ते शनिवार (ता. ४) या कालावधीत सोयाबीनची ३८०० क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान ४५९९ ते कमाल ५३६३ रुपये दर मिळाले.

Soybean Rate
Soybean Market : सोयाबीनचे दर वाढणार; शेतकऱ्यांना फायदा होणार का?

शुक्रवारी (ता. ३) सोयाबीनची ९०० क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान ४८०० ते कमाल ५३०० रुपये तर सरासरी ५०५० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. २) सोयाबीनची ५०५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४७०० ते कमाल ५३२८ रुपये तर सरासरी ५०१४ रुपये दर मिळाले.

Soybean Rate
Soybean Cotton Rate : केंद्र, राज्याकडून सोयाबीन, कापूस उत्पादकांची फसवणूक

बुधवारी (ता. १)५११ क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान ४८०० ते कमाल ५३६३ रुपये तर सरासरी ५०८१ रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. ३१) ५०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ४६९९ ते कमाल ५३२५ रुपये तर सरासरी ५०१२ रुपये दर मिळाले.

सोमवारी (ता. ३०) ८०० क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटल किमान ४५९९ ते कमाल ५२३५ रुपये तर सरासरी ४९१७ रुपये दर मिळाले.

धान्य बाजारात स्थानिक परिसरातून सोयाबीनच आवक सुरू आहे. मागील १५ ते २० दिवसांपासून सोयाबीनचे दर काहीसे स्थिर आहेत. त्याआधी दर कमी झाले होते. तेजी येऊन दरांमध्ये प्रति क्विंटल सहा हजार रुपये किंवा त्याहून अधिक वाढ होईल या अपेक्षेने अनेक शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेले आहे. परिणामी गतवर्षीच्या तुलनेत यंदा धान्य बाजारातील सोयाबीनची आवक कमी आहे.

- नारायण पाटील, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, हिंगोली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com