Sunflower Market Rate : नांदेड बाजारात सूर्यफुलाला प्रतिक्विंटल ४३४५ चा दर

नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत असलेल्या नवा मोंढा बाजारात सध्या सूर्यफुलाची आवक सुरू झाली आहे.
Sunflower
SunflowerAgrowon
Published on
Updated on

Nanded Sunflower Market : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत असलेल्या नवा मोंढा बाजारात सध्या सूर्यफुलाची आवक सुरू झाली आहे. या सूर्यफुलाला सरासरी प्रतिक्विंटल ४३४५ रुपयांचा दर मिळत असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्राने दिली.

नांदेड जिल्ह्यातील काही भागांत तिन्ही हंगामांत सूर्यफुलाची लागवड केली जाते. किनवट, नायगाव, कंधार, बिलोली या तालुक्यांतील शेतकरी सूर्यफुलाची लागवड करतात. सध्या हिवाळ्यात उशिरा पेरलेल्या सूर्यफुलाची आवक सुरू आहे.

Sunflower
Sunflower Market : सूर्यफुल तेलाच्या दरात १५ टक्क्यांची घट

सोमवारी (ता. १७) नवा मोंढा बाजारात चाळीस पोते सूर्यफुलाची आवक झाली. यास प्रतिक्विंटल सरासरी ४३४५ रुपये दर मिळाला. यानंतर उन्हाळी हंगामात पेरलेल्या सूर्यफुलाची आवक सुरू होते, अशी माहिती मिळाली. नांदेड बाजारात सध्या हळद, सोयाबीन, हरभरा, करडई, गहू, ज्वारी, राजमा आदी शेतीमालाची आवक सुरू आहे.

Sunflower
Sunflower Seed : सूर्यफुलाचे संकरित बियाणे निर्मितीसाठी पंदेकृवि, शासनाचा पुढाकार

नांदेड बाजार समितीतील शेतीमालाचे सरासरी दर

हळदीची मोठ्या प्रमाणात आवक होणाऱ्या नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या शेतीमालाची आवक सर्वसाधारण आहे. यात शेतीमालाच्या दरातही स्थिरता आली आहे.

बाजारात सोयाबीन - पाच हजार, हळद - सहा हजार, हरभरा - ४६२०, करडई - चार हजार, गहू - २६००, ज्वारी - २५००, राजमा - ४५७५, सूर्यफूल - ४३४५ प्रमाणे दर मिळत असल्याची माहिती मिळाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com