Mango Season
Mango SeasonAgrowon

Mango Canning : आंबा कॅनिंगला ३० रुपये दर

Mango Season : हापूस आंब्याचा हंगाम पावस परिसरात अंतिम टप्प्यात आहे. वाशीतील बाजार समितीमध्ये आवक वाढल्यामुळे दिवसेंदिवस हापूसचे दर कमी झाले आहेत.
Published on

Ratnagiri News : हापूस आंब्याचा हंगाम पावस परिसरात अंतिम टप्प्यात आहे. वाशीतील बाजार समितीमध्ये आवक वाढल्यामुळे दिवसेंदिवस हापूसचे दर कमी झाले आहेत. त्यामुळे कॅनिंगला आंबा देण्यास सुरवात झाली आहे. सध्या कॅनिंगचा किलोचा दर ३० रुपये मिळत आहे.

हापूसला सुरवातीला चांगला दर मिळत होता. मात्र आता आंब्याची आवक वाढल्यामुळे दर काहीसे कमी झाले आहेत. त्यामुळे आंबा बागायतदार हवालदिल झाले आहेत. प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढत बागायतदार व्यवसाय करत आहेत.

Mango Season
Mango Season : राजापूरमधून आंबा पेटी अहमदाबादला रवाना

दुसऱ्या टप्प्यातील आंबा मे महिन्यात तयार होण्याची शक्यता आहे. त्यामधून मिळणारे उत्पादन हे पावसाच्या आगमनावर अवलंबून आहे.

Mango Season
Mango Season : गुढीपाडव्यानिमित्त वाढली विविध आंब्यांना मागणी

आंबा मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे वाशी बाजारातील दर उतरले आहेत. काही बागायतदार कमी दर्जाचा आंबा कॅनिंगसाठी देत आहेत.

आंबा बागायतदार अण्णा गुरव म्हणाले, ‘‘यंदा आंबा पीक चांगले असल्यामुळे त्याला दरही चांगला मिळत आहे. मात्र, आंबा कमी झाल्यामुळे आंब्याची राखण होत नाही. त्यामुळे रात्री आंबा चोरी होत आहे.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com