Mango Market : चिपळूणमध्ये हापूसला शेकडा १८०० रुपये दर

Mango Rate : हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरीही शेवटच्या टप्प्यात फळाच्या आकारानुसार पेटीचा दर दीड ते दोन हजार रुपयांपर्यंत आहे.
Mango Market
Mango MarketAgrowon

Ratnagiri News : हापूसचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असला तरीही शेवटच्या टप्प्यात फळाच्या आकारानुसार पेटीचा दर दीड ते दोन हजार रुपयांपर्यंत आहे. कॅनिंगचा दरही ३० ते ३५ रुपये किलोपर्यंत आहे. हापूसचा दर हंगामात हळूहळू आवाक्यात येऊ लागल्यामुळे सर्वसामान्यांकडून खरेदी सुरू झाली आहे.

तर चिपळुणमध्ये हापूसला शेकडा १८०० रुपये दर मिळत आहे. त्यामुळे यंदा समाधानकारक उत्पादन हाती लागल्यामुळे बागायतदार समाधानी आहेत. आता जेमतेम आठ दिवस हापूस आंबा हाती राहील, असे बागायतदारांकडून सांगण्यात आले. लहरी हवामान, अवेळी पाऊस, उन्हाची वाढलेली काईली अशा हवामानात यावर्षीचा हापूस हंगाम राहिला. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी समाधानकारक पीक बागायतदारांच्या हाती लागले.

Mango Market
Mango Season : सातपुड्यातील आंब्याचा हंगाम अंतिम टप्प्यात

पावसाने देखील मेच्या पंधरवड्यापर्यंत मेहरबानी केल्याने हापूसला चांगला दर मिळाला. गतवर्षीच्या तुलनेत २० टक्के अधिक उत्पादन हाती आल्याची माहिती बागायतदारांनी दिली. २० मेपर्यंत ५०० ते ७०० रुपये डझन दराने आंबा विकला जात होता. छोट्या आकाराचा हापूस साडेतीनशे ते पाचशे रुपयांनी विकला गेला. मेच्या अखेरीस हापूसचे भाव थोडे कमी झाले, परंतु आवक कमी झाली.

Mango Market
Mango Export : कृषी अधिकाऱ्यांच्या तत्परतेने रात्रीतूनच आंबा पोहोचला लंडनला

दोन डझनाचे हापूसचे खोके चारशे ते सहाशे रुपयांनी विकले जात होते. तर पेटीचा दर हापूसच्या आकारानुसार दीड हजार ते दोन हजार रुपयांप्रमाणे मुंबई मार्केटला विकला जात आहे. मेच्या शेवटच्या आठवड्यातही हा दर कायम आहे.

अनेक बागायतदारांकडील नेपाळी गुरखेही आंबा हंगाम संपत आल्याने गावी परतू लागले आहेत. काही मोजक्याच बागायतदारांकडील आंबा काढण्याचे काम शिल्लक आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात हापूसचा हंगाम संपेल. शिल्लक माल कॅनिंगला दिला जात असून त्याचा दरही किलोला ३० ते ३५ रुपये आहे. दरवर्षी हा दर २० ते २५ रुपयांपर्यंत असतो. पाऊस पडला की हापूसचा दर खाली घसरतो.

हापूसप्रमाणेच पायरी आंब्यालाही मागणी असून, हा आंबाही यंदा कमी प्रमाणातच बाजारपेठेत उपलब्ध झाला. त्यामुळे हापूस इतकेच दर पायरीलाही मिळाले. बाजारपेठेतून यंदा पायरीही लवकरच गायब झाल्याचे पहायला मिळत आहे. दरम्यान, फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात ज्या बागायतदारांनी तोड सुरू केली, त्यांच्याकडील आंबा संपला आहे. सर्वसाधारण साठ टक्क्यांहून अधिक बागायतदारांची कामे आटोपली आहेत. त्यामुळे बागांमधील कामगारही माघारी परतले आहेत.

यंदा मार्चच्या सुरुवातीला हापूसची काढणी सुरू केली. सुरुवातीला हंगामाबाबत साशंकता होती. मात्र शेवटच्या टप्प्यात चांगला दर मिळाला. नैसर्गिक पद्धतीने आंबा पिकवत असल्यामुळे आम्हाला सध्या चांगला दर मिळत आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत उत्पादन हाती येईल.
- जयवंत बिर्जे, रत्नागिरी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com