Sesame Market : यवतमाळ बाजार समितीत तिळाची १६९८ क्‍विंटल आवक

Sesame Rate : भुईमुगाच्या तुलनेत अधिक उत्पादकता आणि किडरोगाचा कमी प्रादुर्भाव या कारणामुळे दारव्हा तालुक्‍यात उन्हाळी तिळाचा पेरा वाढला होता.
Sesame Market
Sesame Market Agrowon
Published on
Updated on

Yavatmal News : भुईमुगाच्या तुलनेत अधिक उत्पादकता आणि किडरोगाचा कमी प्रादुर्भाव या कारणामुळे दारव्हा तालुक्‍यात उन्हाळी तिळाचा पेरा वाढला होता. तब्बल दोन हजार हेक्‍टरची लागवड या भागात होते.

तिळाखालील लागवड क्षेत्र वाढल्यामुळे यवतमाळ बाजार समितीत तीळ खरेदीदारांची संख्याही वाढली असून यंदाच्या हंगामात एक एप्रिलपासून आतापर्यंत सुमारे १६९८ क्‍विंटल तिळाची आवक नोंदविण्यात आली आहे.

दारव्हा तालुक्‍यातील गाजीपूर परिसर हा भुईमूग लागवडीसाठी प्रसिद्ध होता. परंतु त्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढल्याने हे क्षेत्र आता तिळाखाली आले आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, एकट्या दारव्हा तालुक्‍यात तीळ लागवड दोन हजार हेक्‍टरपेक्षा अधिक आहे. मात्र तिळाची बाजारपेठ उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना इतर जिल्ह्यांत तीळ विकावा लागत होता.

Sesame Market
Sesame Production : तिळाने उघडले संपन्नतेचे दार...

आता मात्र यवतमाळ बाजार समितीतच व्यापाऱ्यांकडून तिळाची खरेदी होते. यंदा सुरुवातीला तिळाला १२ हजार रुपयांपर्यंतचा दर होता. त्यांनतरच्या कालावधीत यात तेजी येत दर १४५०० रुपयांपर्यंत पोहोचले. मध्यंतरी १३५०० ते १४००० असा दर तिळाला मिळाला.

Sesame Market
Sesame Market : विदर्भात तिळाला क्विंटलला १३ हजार रुपयांचा दर

नागपूर भागातून व्यापारी तिळाच्या खरेदीसाठी यवतमाळला येत होते. परिणामी मागणी वाढल्याने यंदा दर चांगलेच तेजीत राहिले, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. अमरावती बाजार समितीतदेखील तिळाची आवक नोंदविण्यात आली.

या ठिकाणीदेखील दर १३५०० रुपयांपर्यंत होते. आता तिळाचा हंगाम संपल्याने यवतमाळसह इतरही बाजारांतील आवकदेखील संपुष्टात आल्याची स्थिती आहे.

भुईमुगाला ७७३० रुपयांचा दर

यवतमाळ बाजारात काही अंशी भुईमूग शेंगाचीदेखील आवक होत आहे. बाजार समितीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भुईमुगाचे व्यवहार सरासरी ७०५० रुपये क्‍विंटलने होत असून अपदावात्मकस्थितीत दरात किंचित चढउतार होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com