Soybean MSP : हमीभावाने मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी १५ केंद्र

केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने खरीप हंगाम २०२२-२३ मध्ये मूग, उडीद, सोयाबीन हमीभावाने खरेदी करण्याकरिता परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १५ खरेदी केंद्र निश्‍चित करण्यात आली आहेत.
Moong Udid Soybean Market
Moong Udid Soybean MarketAgrowon
Published on
Updated on

परभणी ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत (MSP Scheme) नाफेडच्या (NAFED) वतीने खरीप हंगाम २०२२-२३ (Kharif Season 2022-23) मध्ये मूग, उडीद, सोयाबीन (Moong Urad, Soybean MSP) हमीभावाने खरेदी करण्याकरिता परभणी, हिंगोली जिल्ह्यांत १५ खरेदी केंद्र निश्‍चित करण्यात आली आहेत. या केंद्रांवर शुक्रवार (ता. ४) शेतकरी नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे. १० नोव्हेंबर ते ७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत खरेदी करण्यात येईल, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी के. जे. शेवाळे यांनी दिली.

Moong Udid Soybean Market
Agri Commodity MSP : रब्बी हंगामातील पिकांसाठी हमीभाव जाहीर | ॲग्रोवन

शेतकऱ्यांनी संबंधित तालुक्यातील केंद्राच्या ठिकाणी नोंदणी करिता सोबत खरीप हंगाम २०२२-२३ मधील पीक पेरा नोंद असलेला ऑनलाइन सातबारा, आधारकार्ड झेरॉक्स, बँक पासबुक झेरॉक्स, सोबत आणावे व बँक पासबुकवर शेतकऱ्यांचे नाव, खाते क्रमांक, आय.एफ.एस.सी. कोड स्पष्ट असावा (जनधन बँक खात किंवा पतसंस्थेतील खाते क्र. देऊ नये.) संबंधित तालुक्यातील केंद्राच्या ठिकाणी मूग, उडीद, सोयाबीन हमीभावाने विक्रीकरिता शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन शेवाळे यांनी केली आहे.

केंद्राचे नाव केंद्राचे ठिकाण केंद्रचालक संपर्क क्रमांक

परभणी पेडगाव, ता. परभणी माणिक नीलवर्ण ९९६००९३७९६

जिंतूर जिंतूर नंदकुमार महाजन ९४०५४७३९९९

बोरी बोरी, ता. जिंतूर संतोष गलांडे ९३७०४४१०३५

सेलू मार्केट यार्ड, सेलू विठ्ठल शिंदे ९८६०९८६८५४

Moong Udid Soybean Market
Sugar Export : मे नंतर आणखी साखर निर्यातीस परवानगी शक्य

मानवत मार्केट यार्ड, मानवत माणिक भिसे ९८६०६५४१५९

पाथरी मार्केट यार्ड, पाथरी अनंत गोलाईत ९९६०५७००४२

सोनपेठ शेळगाव रोड, सोनपेठ श्रीनिवास राठोड ९०९६६९६९७

पुर्णा मोंढा, पूर्णा संदीप घाटोळ ९३५९३३३४१३

हिंगोली बलसोंड ता. हिंगोली समीरपाटील ९४२२९२२२२२

कन्हेरगांव कन्हेरगाव, ता. हिंगोली अमोल काकडे ८००७३८६१४३

कळमनुरी कृउबा समिती, कळमनुरी महेंद्र माने ९७३६४४९३८३

वसमत कृउबा समिती, वसमत सागर इंगोले ८३९०९९५२९४

जवळा बाजार जवळा बाजार,

ता. औंढा नागनाथ कृष्णा हरणे ९१७५५८६७५८

सेनगाव सेनगाव, जि. हिंगोली नीलेश पाटील ९८८११६२२२२

साखरा साखरा, ता. सेनगाव उमाशंकर माळोदे ९४०३६५१७४३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com