Mango Market : वाशीत हापूस आंब्याच्या १ लाख २२ हजार पेट्या

Mango Season : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कोकणचा हापूस बाजारात पाठविण्याची परंपरा यंदाही अनेक बागायतदारांनी जपली आहे.
Mango Season
Mango Season Agrowon

Ratnagiri News : गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कोकणचा हापूस बाजारात पाठविण्याची परंपरा यंदाही अनेक बागायतदारांनी जपली आहे. त्यामुळे सलग दोन दिवस वाशी बाजारात हापूसच्या ६७ हजार आणि ५५ हजार पेट्या दाखल झाल्या आहेत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट पेट्या आल्याचे वाशीतील व्यावसायिकांनी सांगितले.

रत्नागिरी जिल्ह्यातून गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला हापूस आंबा विक्रीसाठी पाठविण्याची परंपरा आहे. त्यानंतर खऱ्या अर्थाने हंगाम सुरू होतो. परंतु यंदा फेब्रुवारी आणि मार्चमध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून तुलनेत सर्वाधिक हापूस वाशीसह पुणे, अहमदाबाद, पश्‍चिम महाराष्ट्रातील विविध बाजारांत दाखल झाला.

Mango Season
Mango Season : गुढीपाडव्यानिमित्त वाढली विविध आंब्यांना मागणी

लवकर आणि मुबलक आंबा विक्रीसाठी आला होता. ५० टक्केहून अधिक बागायतदारांनी पाडव्याला विक्रीचा मुहूर्त केलेला आहे. त्यांच्याबरोबर इतर बागायतदारांच्या मिळून सोमवारी (ता. ८) वाशी बाजारात दाखल झालेल्या ९२ हजार पेट्यांपैकी हापूसच्या ६७ हजार पेट्या आहेत. तर उर्वरित अन्य आंबे आहेत. मंगळवारी (ता. ९) ५५ हजार पेट्या आंबा कोकणातून दाखल झाल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

पाडव्याला एक लाख पेट्या कोकणातून पाठविल्या जातात. ही परंपरा यंदाही कायम असल्याचे आकडेवारी पाहता दिसून येते. गतवर्षी याच कालवधीत ४० हजार पेट्या आल्या होत्या.

दरम्यान, हंगामाच्या आरंभाला हापूसचा पेटीचा दर साडेसहा ते सात हजार रुपये होता. मात्र आवक वाढत गेली तसा दर कमी होऊ लागला. मार्चच्या पहिल्या आठवड्यात ५० टक्क्यांवर दर आले.

Mango Season
Mango Production : फळांचा राजा असणाऱ्या अंबा उत्पादनात ही राज्य आहेत अग्रेसर

त्यामुळे आंबा बागायतदार हादरले होते. आवक वाढण्याबरोबरच निर्यात करण्यातील अडथळेही कारणीभूत असल्याची कारणे वाशीतील व्यावसायिकांनी पुढे केली होती. रत्नागिरीतील बागायतदारांनी व्यावसायिकांशी संवाद साधत दर स्थिर ठेवण्याची मागणी केली होती. त्यानंतर काही कालावधीसाठी पेटीचा दर ३७०० रुपयांपर्यंत राहिला. सध्या दर्जेदार आंब्याला डझनाला ८०० रुपये दर मिळत आहे, असे व्यावसायिकांनी सांगितले.

दर गेल्यावर्षीपेक्षा कमी पण स्थिर

हापूसचा दर ३०० ते ८०० रुपये डझन आहे. तो मागील वर्षीच्या तुलनेत ५०० रुपयांनी कमी आहे. मात्र मागील आठवड्यातील घसरण काही अंशी थांबल्यामुळे बागायतदारांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

वाशी बाजारातील हापूसची आवक यंदा तुलनेत अधिक आहे. गतवर्षी याच कालावधीत कोकण वगळता अन्य भागातील आंबे अधिक होते. दर गतवर्षीपेक्षा कमी असले तरीही स्थिर आहेत. आखाती देशातील निर्यात चार दिवसांनी पुन्हा सुरू झाली आहे.
- संजय पानसरे, संचालक, वाशी बाजार समिती.
मागील आठवड्यात हापूसची आवक कमी राहिल्यामुळे आणि ग्राहक अधिक असल्याने पेटीचा दर स्थिर राहिला. सध्या साठ टक्केहून अधिक बागायतदारांकडील आंबा काढणी पूर्ण होत आली आहे. त्यामुळे एप्रिलमध्ये दर स्थिर राहील. हा दर असाच राहिला तर हंगामातील खर्च भरून निघेल.
- राजेंद्र कदम, आंबा बागायतदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com