नाही चिरा... नाही पणती

सोमय्या आणि राऊत यात विभागलेल्या महाराष्ट्राला रमाबाई या वर्षभरात फारशा आठवल्या नाहीत
Pandita Ramabai
Pandita Ramabai Agrowon
Published on
Updated on

पंडिता रमाबाई Pandita Ramabai) यांच्या मृत्यूला पाच एप्रिल २०२२ रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली. प्रचंड व्यासंग, लेखन, परदेशामध्ये भारताची कीर्ती, महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणांमध्ये योगदान आणि शंभर वर्षांपूर्वी विधवांच्या प्रश्नावर प्रत्‍यक्ष काम उभे करणे यातल्या नेमक्‍या कोणत्या गोष्टींसाठी रमाबाईंना लक्षात ठेवावे? इतके अफाट योगदान असणाऱ्या विदुषीच्या स्मृतिशताब्दीचा महाराष्ट्रावर (Maharashtra) ओरखडासुद्धा उमटला नाही.
सोमय्या आणि राऊत यात विभागलेल्या महाराष्ट्राला रमाबाई या वर्षभरात फारशा आठवल्या नाहीत. महाराष्ट्राला नेमकं काय झाले आहे? अगदी तुरळक कार्यक्रम वगळता वर्षभर व त्यादिवशीही फारसे कार्यक्रम झाले नाही. माझे मित्र आणि कार्यकर्ते रवींद्र धनक त्या दिवशी त्यांच्या स्मृतिस्थळावर गेले होते. तेव्हा तिथे सन्नाटा असल्याचे त्यांना बघायला मिळाले. असे का होत असावे? एकतर हे महापुरुष सहजपणे सर्वत्र पोहोचत नाहीत व स्मृतिशताब्दी, जन्मशताब्दी असे निमित्त येतात. त्या दिवशी किंवा आजूबाजूलाही काही घडत नाही.

Pandita Ramabai
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नगदवाडीत पीक कर्जवाटप

किमान विधवांच्या रोजगार योजनेला (least to the widow's employment scheme) रमाबाईंचे नाव द्या, या आमच्या विनंतीवरून सरकारने बजेटमध्ये व्याज माफीच्या योजनेला पंडिता रमाबाईचे नाव दिले. इतकेच फक्त समाधान! आमच्या कोरोना एकल पुनर्वसन समितीचे गडचिरोली येथील कार्यकर्ते सूर्यप्रकाश गभने यांनी एक कार्यक्रम आयोजित केला. हे एक समाधान!!
महाराष्ट्रात असलेली इतकी वाचनालये, इतकी विद्यापीठे, इतकी महाविद्यालय, सामाजिक संस्था असताना रमाबाईंच्या बाबतीत सर्वत्र कार्यक्रम का झाले नसतील? त्यांनी ख्रिश्‍चन धर्म स्वीकारला होता हे कारण बटबटीत वाटेल पण त्याचा त्यांच्या योगदानाची नोंद घेण्यावर परिणाम झाला का? असेही मनात येऊन जाते.
महाराष्ट्रात एखाद्या महापुरुषाच्या (great men) पाठीशी त्याची जात उभी राहिली तरच उरलेला समाज दखल घेतो का, असेही मनात येऊन गेले.

रमाबाई एक स्त्री होत्या. त्यांच्या कामाचे स्वरूप संघटित स्वरूपात पुढे गेले नाही म्हणून असे होते का? की एकूणच बौद्धिक क्षेत्रात पराक्रम केलेल्या व्यक्ती, समाजासाठी झोकून दिलेल्या व्यक्ती हा आमचा प्राधान्याचा विषय राहिला नाही, या महाराष्ट्रातील सुमार पर्वात त्यांची स्मृती शताब्दी आली म्हणून तर असे झाले नसेल?
पण हरकत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. महाराष्ट्रातील विद्यापीठे (Maharashtra University) महाविद्यालय वाचनालय व सर्व संस्थांनी एखादा कार्यक्रम आयोजित करावा व केवळ त्यांचे गुणगौरव न करता रमाबाईंचे योगदान व आजच्या समाजातील विधवा व वंचित महिलांचे प्रश्‍न असे चर्चेचे कार्यक्रम घेतले तर त्यातून जनजागरण होईल व रमाबाईंचे योगदानही पोहोचेल. आपण सारे पुढाकार घेऊया. आम्ही लवकरच विधवा महिलांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी असे व्याख्यान आयोजित करतो आहोत. आपणही करावे.

- हेरंब कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते, नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com