इटकरे (ता.वाळवा,जि.सांगली) येथील उपक्रमशील महिला सौ. सुजाता गजवंत पवार यांनी चैतन्य दीप महिला स्वयंसहाय्यता समुहाच्या माध्यमातून मसाला निर्मिती उद्योगाला चालना दिली. गेल्या चार वर्षात गुणवत्तेमुळे बाजारपेठेत त्यांच्या मसाल्यांची वेगळी ओळख तयार झाली आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर पेठ नाक्यापासून दहा किलोमीटर अंतरावर इटकरे गाव लागते. या गावातील सौ.सुजाता गजवंत पवार यांनी दहा महिलांना एकत्र करून बचत गटास सुरूवात केली. दर महिन्याला बचतीसाठी मासिक वर्गणी जमा करणे हा पहिल्यांदा मर्यादित उद्देश होता. त्यानंतर त्यांनी पंचायत समिती अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चैतन्य दीप महिला स्वयंसहाय्यता समुहाची शासकीय नोंदणी केली. पवार कुटुंबियांकडे शेती क्षेत्र कमी असल्याने म्हैसपालन सुरू केले. जातिवंत दुधाळ म्हशीचे संगोपन आणि विक्रीतून त्यांनी पंचक्रोशीत वेगळी ओळख तयार केली. दरवर्षी किमान तीन ते चार दुधाळ म्हशींच्या विक्री होत होती. दूध उत्पादन आणि म्हैस विक्रीतून आर्थिक उत्पन्नही चांगले मिळायचे. परंतु मजूर टंचाई आणि पशुखाद्याचे दर वाढल्याने दुग्ध व्यवसाय कमी केला. सध्या घरापुरत्या दोन म्हशींचे संगोपन केले जाते. मिळवली हक्काची बाजारपेठ मसाले तयार झाले, परंतु मार्केटमध्ये विक्री करताना महिला गटाची मोठी कसोटी लागली. पंचक्रोशीतील काही विक्रेते आमच्याकडे इतर मसाले आहेत, त्यामुळे तुम्ही मसाला सॅम्पल ठेवा, असे सांगायचे. त्यामुळे सुजाताताईंना पंचक्रोशीतील दुकानदारांना सुरवातीला साडेचार हजार रुपयांचा मसाला केवळ सॅंपलसाठी द्यावा लागला. त्यामुळे पहिल्या टप्यात उत्पन्नाची शाश्वती नव्हती. परंतू हळूहळू ग्राहक, दुकानदार मसाल्याची मागणी करू लागले आणि उद्योगाला गती मिळाली.बाजारपेठेत गटाच्या मसाल्याची वेगळी ओळख तयार होण्यासाठी सुजाताताईंनी ‘जान्हवी मसाले‘ हा ब्रॅण्ड तयार केला. त्यांची सरकारी पातळीवर नोंदणी देखील केली. त्यामुळे बाजारपेठेत गटाच्या मसाल्यांना नवी ओळख मिळाली. विक्रेत्यांची मागणी वाढू लागल्याने गटाचा आत्मविश्वास दुणावला. हळूहळू मसाला उत्पादनांना स्वतःची बाजारपेठ तयार झाली. यासाठी पहिल्यांदा प्रचंड कष्ट गटाला करावे लागले. बचत गटाला उमेद अभियानाचे व्यवस्थापक आशुतोष यमगर, समन्वयक विजय पाटील यांचे चांगले सहकार्य लाभले आहे. तीस प्रकारचे मसाले गटातील महिला पनीर, गरम, चिकन, मटण,बिर्याणी, कुर्मा, अंडा करी, मालवणी मसाला, तांबडा रस्सा,फिश, चिली पावडर,पाव भाजी, सब्जी,चिकन ६५, छोले मसाला, धना पावडरसह तीस प्रकारचे मसाले तयार करतात.पहिल्या टप्यात प्लॅस्टिक पाऊचमध्ये मसाले पॅकिंग केले जात होते. परंतु बाजारपेठेत उत्पादनांचा वेगळेपणा जपण्यासाठी गटाने मसाल्याची बॉक्स पॅकिंगमध्ये विक्री सुरू केली.आतून चंदेरी रंगाचे पॅकिंग आणि वरून बॉक्स पेटी असे स्वरूप आहे. दहा,बारा,पंधरा आणि तीस ग्रॅममध्ये मसाल्याचे पॅकिंग केले जाते. सरासरी प्रति किलो ६५० रूपये असा दर आहे. दख्खन जत्रेमध्ये मसाला उत्पादनांना चांगला प्रतिसाद मिळाल्याने राज्यभर मसाल्याची ओळख तयार होण्यास मदत झाली. याचबरोबरीने परिसरातील बचत गटांनादेखील सुजाताताई प्रक्रिया उद्योगाबाबत मार्गदर्शन करतात. बचत गटाची मसाला उद्योगातील प्रगती लक्षात घेऊन सुजाता पवार यांना बचत गटांच्या वतीने देण्यात येणारा ‘जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार' जाहीर झाला आहे. गुणवत्ता आणि सचोटीने व्यवहार
जोडले १६०० दुकानदार सध्या पंचक्रोशीतील काही विक्रेते जागेवर येऊन विविध प्रकारचा मसाला खरेदी करतात.तर काही छोट्या विक्रेत्यांना जागेवर जाऊन मसाले पोहोच करावे लागतात. विविध गावांच्यामध्ये मसाला बॉक्स पोहोचविण्यासाठी गाडी खरेदी केली आहे. पती गजवंत आणि मुलगा उमेश यांची मसाला वाहतूक आणि विक्रीसाठी चांगली मदत होते. सध्या वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यातील सुमारे १०० गावांतील १६०० दुकानांमध्ये मसाला विक्रीसाठी पाठविला जातो. दरमहा एक लाखाच्या उलाढालीतून ३० टक्के नफा मिळतो, असे सुजाताताई सांगतात. मसाला निर्मिती उद्योगाला सुरूवात
संपर्क- सौ. सुजाता पवार, ९६३७२९१२२२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.