
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने कृषी शाखेच्या प्रमाणपत्र, पदविका, पदवी शिक्षणक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सूचना जारी केली आहे. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ अंतर्गत या अभ्यासक्रमांचा प्रवेश अर्ज भरण्याची मुदत ३० जूनपर्यंत दिली आहे. प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाइन राबविली जात आहे.
विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरताना छायाचित्र, स्वाक्षरीच्या स्कॅन कॉपीसह आरक्षणासाठी आवश्यक असलेली मूळ प्रमाणपत्रे, दाखले आदी कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करावी लागेल. अर्ज भरताना समस्या उद्भवल्यास विद्यार्थ्यांना संबंधित कृषी शिक्षण केंद्राची मदत घेता येईल. निर्धारित कालावधीमध्येच अचूकपणे भरलेला, सत्यता असलेला, तसेच सर्व अपलोड केलेली कागदपत्रे सुस्पष्ट दिसतील, असे स्कॅन केलेले असलेले प्रवेश अर्जच पुढील प्रवेश प्रक्रियेसाठी ग्राह्य धरण्यात येतील, असे विद्यापीठातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
पदवी अभ्यासक्रमाची १६ जुलैला सीईटी
कृषी विज्ञान आणि उद्यानविद्या पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेण्यासाठी पदवी प्रवेश परीक्षा (सीईटी) उत्तीर्ण होणे आवश्यक असेल. ही सीईटी परीक्षा १६ जुलैला होईल. निकाल २० जुलैला जाहीर करण्याचे नियोजित आहे. प्रवेश प्रक्रियेच्या पुढील टप्प्यात प्रथम फेरी गुणवत्तायादी २६ जुलैला प्रसिद्ध होईल. यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी २७ ते ३० जुलै अशी वेळ दिली जाईल. दुसरी गुणवत्तायादी ३ ऑगस्टला प्रसिद्ध होईल. यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ४ ते ६ ऑगस्ट अशी मुदत असेल.
प्रमाणपत्र, पदविकेसाठी प्रक्रिया अशी
कृषी प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेअंतर्गत प्रथम फेरी गुणवत्तायादी ६ जुलैला प्रसिद्ध केली जाईल. यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी ७ ते ११ जुलै मुदत असेल. दुसरी गुणवत्तायादी १५ जुलैला प्रसिद्ध केली जाईल. विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी १६ ते १९ जुलैपर्यंत मुदत असेल. शिल्लक जागांवर पुढील प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश दिला जाणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.