Soil Based Farming: खरीप पिकांची निवडजमिनीनुसारभारी : कापूस, तूर, सोयाबीनमध्यम : सूर्यफूल, तूर, बाजरी, सोयाबीनहलकी : बाजरी, कुळीथ, तीळ, कारळा, एरंडी.ऊसपूर्वमोसमी पावसाच्या काळात हुमणी अळीच्या भुंग्याचा वावर हा प्रामुख्याने संध्याकाळी ६ ते ८ च्या दरम्यान असतो. त्याकरिता एकरी एक प्रकाश सापळा संध्याकाळी ६ ते ८ वाजेच्या दरम्यान लावावा..Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग.कापूसजमीन : मध्यम ते खोल व पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी.पूर्वमशागत ः जमिनीला एक नांगरट, २ ते ३ कुळवाच्या पाळ्या देऊन ती भुसभुशीत करून घ्यावी..सोयाबीनजमीन : मध्यम काळी पोयट्याची, चांगली निचरा होणारी.पूर्वमशागत : एक नांगरट, दोन कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी..Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग.मूग व उडीदजमीन : मूग आणि उडदाला मध्यम ते भारी, चांगली निचरा होणारी जमीन आवश्यक असते. पाणी साचून राहणारी क्षारपड, चोपण किंवा अत्यंत हलकी जमीन टाळावी.पूर्वमशागत : चांगली पूर्वमशागत ही मूग आणि उडदाच्या अधिक उत्पादनासाठी आवश्यक बाब आहे. यासाठी उन्हाळ्यापूर्वी जमीन नांगरावी..तूरजमीन : मध्यम ते भारी, पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन तूर पिकाकरिता योग्य असते. चोपण, पाणथळ जमिनीत तूर चांगली येत नाही. कसदार, भुशभुशीत, पोयट्याच्या जमिनीत सुद्धा तूर चांगली येते. जमिनीत स्फुरद, कॅल्शिअम, गंधक या द्रव्यांची कमतरता नसावी. साधारणत: ६.५ ते ७.५ सामू असलेली जमीन या पिकास योग्य असते.पूर्व मशागत : एक नांगरट व दोन-तीन कुळवाच्या द्याव्यात..बाजरीजमीन : बाजरी पिकासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी हलकी ते मध्यम जमीन निवडावी. जमिनीचा सामू हा ६.२ ते ८ असावा. हलक्या जमिनीत बाजरी हे पीक घ्यावयाचे असल्यास सरी-वरंबा पद्धत फायदेशीर ठरते.पूर्वमशागत : जमिनीची १५ सें.मी. पर्यंत खोल नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणी अगोदर प्रति हेक्टरी ५ टन / १० ते १५ गाड्या शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात पसरावे..भुईमूगजमीन : मध्यम, भुसभुशीत, चुना व सेंद्रिय पदार्थ योग्य प्रमाणात असलेली व पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी.पूर्वमशागत : एक नांगरट व दोन-तीन कुळवाच्या द्याव्यात..मकाजमीन : मध्यम ते भारी, खोल, रेतीयुक्त, उत्तम निचऱ्याची विशेषत: नदीकाठची गाळाची जमीन फारच उत्तम.पूर्वमशागत : एक खोल नांगरट, २-३ कुळवाच्या पाळ्या देऊन २० ते २५ गाड्या प्रति हेक्टरी शेणखत/ कंपोस्ट खत या वेळी शेतात मिसळून घ्यावे. ०२४२६ -२४३२३९ग्रामीण कृषी मौसम सेवा व कृषी विद्या विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.