थोडक्यात माहिती: १. पंप, गाळणी, पाईपलाईन, उपनळ्या आणि ड्रिपर्सची नियमित तपासणी व स्वच्छता करणे आवश्यक.२. वाळू व जाळी गाळण्या आठवड्यातून किमान एकदा स्वच्छ कराव्या आणि गळती होत असल्यास बंद करावी.३. पाईपलाईन व उपनळ्या ठराविक काळाने फ्लशिंग करून स्वच्छ पाणी प्रवाहित करणे.४. ड्रिपर्स बंद होऊ नयेत म्हणून क्लोरीन प्रक्रिया शेवटच्या अर्ध्या तासात करणे.५. संच वापरत नसताना उपनळ्या गुंडाळून ठेवणे व आम्ल/क्लोरीन प्रक्रिया करणे..Irrigation Care and Management: शेतकरी अनेक पिकांना ठिबक सिंचनाने पाणी देतात. परंतु शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन संचाची योग्य ती काळजी आणि निगा राखल्यास तो संच दीर्घकाळ टिकतो. त्याची कार्यक्षमता चांगली राहते, सिंचनाच्या खर्चात बचत होते परिणामी उत्पादन खर्चात बचत होते. ठिबक सिंचनाच्या संचाच्या काळजी व देखभाल शेतकरी सोप्या पद्धतींनी करु शकतात..Sugarcane Fertilizer Management : उसासाठी ठिबक सिंचनाद्वारे खतांचा वापर.१. पंपाची देखभालपंपाच्या पुढे एक वॉटर मिटर म्हणजेच पाणी मोजण्याचे यंत्र आणि प्रेशर गेज म्हणजे दाब मापक यंत्र बसवावे. पाण्याच्या प्रवाह किंवा पाण्याचा दाब आवश्यकतेनुसार करण्यासाठी पंप तपासून घ्यावा. दर दोन दिवसांनी पंपाचा आवाज, त्याचे तापमान, गळती तपासावी तसेच विद्युत मोटार, स्विचेस, मिटर आणि स्टार्टर यांची कंपनीच्या उत्पादकाने दिलेल्या मार्गदर्शिकेप्रमाणे काळजी घ्यावी. .२. गाळण्याची देखभाल(फिल्टर)पाणी गाळण्यासाठी गरजेनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या गाळण्या वापरल्या जातात. तोट्याचा प्रकार आणि पाण्याची शुद्धता, गुणवत्ता यावरुन गाळण्याचा (फिल्टरचा) प्रकार निवडावा लागतो..वाळूची गाळणीजेव्हा पाण्यामध्ये पालापाचोळा, शेवाळे जास्त असतात तेव्हा वाळुची गाळणी वापरावी. गाळणी आणि त्याच्या झडपा व दाबमापक यंत्रे वगैरे दर दोन दिवसांनी तपासावे. गाळणी आठवड्यातून किमान एकदा साफ करावे. वाळूच्या फिल्टरचे झाकण उघडून वाळूची पातळी तपासावी. वाळू स्वच्छ असल्याची खात्री करावी आणि सर्व गळत्या बंद कराव्यात..बॅक फ्लशींग किंवा विरुद्ध प्रवाह वाळुची गाळणी साफ करण्यासाठी ही प्रक्रिया करावी. ह्या द्वारे पाण्याचा प्रवाह विरुद्ध दिशेने करुन गाळणी धुतली जाते. प्रवाह जास्त झाल्यास वाळू टाकीबाहेर जाते. आणि प्रवाह कमी असल्यास वाळू धुतली जात नाही. म्हणून विरुद्ध प्रवाह योग्य राहील अशा रीतीने कमी-अधिक झडप करुन बसवावी. गरजेनुसार गाळणटाकी मधील वाळु पाण्याने स्वच्छ करावी तसेच गाळण टाकी मधील वाळू कमी झाल्यास त्यामध्ये वाळू परत टाकावी. .Chana Irrigation : हरभऱ्यासाठी तुषार सिंचन फायदेशीर का आहे?.जाळीची गाळणी-वाळूच्या गाळणीच्या पुढे जाळीची किंवा चकत्याची गाळणी वापरतात. परंतु जेव्हा पाणी स्वच्छ असते तेव्हा फक्त जाळीची गाळणी लावावी. ह्या गाळण्या साफ करण्यासाठी त्या उघडून साफ कराव्यात. शक्यतो दररोज जाळीच्या गाळण्या साफ कराव्यात किंवा गाळणीच्या अगोदर आणि पुढील दाबमापक यंत्रातील दाबफरक ०.२ कि.ग्रॅ./चौ.सें.मी पेक्षा अधिक झाल्यास ह्या गाळण्या साफ कराव्या. .या जाळीची छिद्रे बंद झाल्यास प्लॅस्टिक / नायलॉन ब्रशने साफ करावे. जाळीच्या गाळणी यंत्राचा ड्रेन व्हॉल्व्ह उघडून जाळीमध्ये अडकलेली घाण बाहेर काढून टाकावी. नियमितपणे जाळी व्यवस्थित असल्याची खात्री करावी. जाळी फाटली तर नवीन बसवावी, तसेच रबरसील्स धुवावीत..Drip Irrigation Method : जमिनीच्या पृष्ठभागाखालील ठिबक सिंचन पद्धती .३. पाईप लाईन-ठिबक सिंचन हे प्रामुख्याने मुख्य नळी, उप-मुख्य नळ्या आणि उपनळ्या यांचे जाळे असते. ठिबक सिंचन संचाच्या मुख्य आणि उपमुख्य नळ्या ह्या जर पी.व्ही.सी पाईपच्या असेल तर त्या शक्यतो १ फुटापर्यंत जमिनीत गाडाव्यात. त्यामुळे पाईपवर सूर्यकिरणांचा परिणाम होत नाही आणि शेवाळही वाढत नाही. .नळ्यांमध्ये गळती होत असल्यास लगेच त्या बंद कराव्यात. उपमुख्य नळ्यांच्या शेवटी फ्लश व्हॉल्व्ह जोडलेले असतात. त्यातून अंदाजे १० मिनीटे पाणी वाहू दिल्यास मुख्य आणि उपमुख्य दोन्ही नळ्या धुतल्या जातात. ठरावीक कालावधीने या नळ्या धुणे गरजेचे आहे. एअर व्हॉल्व्ह योग्य ठिकाणी बसवावे आणि ते चालू असल्याची खात्री करावी..४. उपनळ्या-उपनळ्या या दर आठवड्यातून एकदा स्वच्छ कराव्यात. त्यासाठी त्या धुवून निघतील या दाबाने पाणी सोडावे. त्या स्वच्छ करण्यासाठी उपनळ्याचे शेवटचे टोक उघडावे. त्यातून स्वच्छ पाणी यायला लागले की शेवटचे टोक बंद करावे. उपनळ्यांमधून गळती आढळून आल्यास गुफ प्लगच्या सहाय्याने बंद करावी. तण काढताना, कोळपणी करताना उपनळ्यांना जपावे. उंदरांपासून उपनळ्यांचा बचाव करण्यासाठी झिंक फॉस्फईडच्या गोळ्या शेतात टाकाव्यात..५. तोट्या (ड्रिपर्स)जर तोट्या शेतामध्ये सर्व ठिकाणी समप्रमाणात नसतील तर ठिबक सिंचन प्रणालीची कार्यक्षमता कमी होऊन उत्पादनात घट होऊ शकते. त्यामुळे ड्रीपर्सची देखभाल करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.ड्रिपर्समधून ठरावीक प्रवाहाने पाणी पिकास दिले जाते का हे तपासण्यासाठी संचाचे वेळोवेळी निरीक्षण करावे. अपेक्षित प्रवाह नसल्यास ड्रिपर्स उघडून स्वच्छ करुन घ्यावे.ड्रिपर्सची छिद्र पाण्यातील जिवाणू, सुक्ष्म जीवजंतू व शेवाळामुळे बंद पडू नये म्हणून क्लोरीन प्रक्रिया द्यावी. क्लोरीन प्रक्रिया नेहमी पाणी देत असतांना शेवटच्या अर्ध्या तासात करावी..ठिबक सिंचन बंद करताना कोणती काळजी घ्याल?मुख्य नळी, उपमुख्यनळी, लॅटरलर्स स्वच्छ कराव्यात.गाळणी यंत्र स्वच्छ पाण्याने साफ करावे. वाळूचे गाळणी यंत्र उघडून त्यातील वाळू सुकू द्यावी.संचासोबत खते देण्याची टाकी असल्यास ती स्वच्छ करावी. ठिबक सिंचन संच वापरात नसताना उपनळ्या काढून गोल गुंडाळून ठेवाव्यात. ठिबक सिंचन संचास बंद करण्यापूर्वी आम्ल व क्लोरिन प्रक्रिया दिल्यास सिंचन जास्त काळ टिकते..वारंवार विचारलेले प्रश्न (FAQs): १. ठिबक सिंचन संच किती वेळाने स्वच्छ करावा?गाळणी आठवड्यातून एकदा आणि उपनळ्या दर आठवड्यात स्वच्छ कराव्यात.२. ड्रिपर्स बंद होण्यापासून कसे वाचवावे?क्लोरीन प्रक्रिया व नियमित स्वच्छता केल्याने ड्रिपर्स बंद होत नाहीत.३. पाईपलाईन फ्लशिंग किती वेळाने करावी?ठराविक कालावधीनंतर १० मिनिटे पाणी सोडून फ्लशिंग करावी.४. गाळणीचा प्रकार कसा निवडावा?पाण्यातील कचरा व शुद्धतेनुसार वाळू गाळणी किंवा जाळी गाळणी निवडावी.५. संच बंद करताना कोणती काळजी घ्यावी?सर्व नळ्या, गाळण्या, खतटाकी स्वच्छ करून उपनळ्या गुंडाळून ठेवाव्यात..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.