जिरायती भागात वेळेवर करा पेरणी
जिरायती परिस्थितीत रब्बी पिकांच्या पाण्याचा ताण सहन करणाऱ्या व कमी ओलाव्यावर उत्पादन देणाऱ्या सुधारित व संकरित जातींची निवड करावी. योग्य वेळी पेरणी केल्यामुळे उपलब्ध ओलावा, अन्नद्रव्यांचा जास्तीत जास्त उपयोग होऊन पिकांची जोमदार वाढ होते.
रब्बी पिकांची पेरणी केल्यानंतर पाऊस पडण्याची खात्री नसते. बियाण्यांची उगवण क्षमता ओलाव्यावर अवलंबून असते. खरीप पिकांच्या कापणीनंतर रब्बी पिकांसाठी पूर्वमशागत करताना वखरणी अथवा नांगरणी जास्त प्रमाणात केल्यास जमिनीतील ओलावा मोठ्या प्रमाणात कमी होतो. त्यामुळे रब्बी पिकांची उगवण, वाढीवर विपरीत परिणाम होऊन उत्पादन घटते. त्यामुळे पूर्वमशागतीची कामे करताना पृष्ठभागातील ओलावा जास्त प्रमाणात कमी होणार नाही.
योग्य वेळी पेरणी :
जमीनीचा प्रकार | खोली (सें.मी.) | उपलब्ध ओलावा (मि.मी.) | पीकपद्धती |
मध्यम | २२.५ - ४५ | ६०-६५ | सूर्यफुल, करडई |
मध्यम खोल | १)४५-६० २) ६०-९० | ८०-९० १४०-१५० | रब्बी ज्वारी, करडई, रब्बी ज्वारी+ करडई (६ः३) आंतरपीक रब्बी ज्वारी, करडई, हरभरा रब्बी ज्वारी+करडई (६ः३) करडई+हरभरा (६ः३) |
खोल | ९०पेक्षा जास्त | १६० पेक्षा जास्त | रब्बी ज्वारी, करडई, हरभरा ही सलग पिके तसेच मूग किंवा उडीद किंवा सोयाबीन (खरीप) नंतर रब्बी ज्वारी, करडई, हरभरा लागवड करावी. |
पीक | सुधारित/ संकरित जाती |
रब्बी ज्वारी | मालदांडी ३५-१, एसपीव्ही-६५५, एसपीव्ही-८३९, फुले यशोदा (एसपीव्ही-१३५९), परभणी मोती (एसपीव्ही-१४११), स्वाती (एसपीव्ही-५०४) |
सूर्यफूल | मॉर्डन, एससीएच-३५, ई.सी.६८४१४, सिद्धेश्वर (एल.एस.- ११) |
करडई | भीमा, शारदा, तारा, एन-६२-८, नारी-६, पीबीएनएस-१२ |
हरभरा | विजय, बीडीएन-९-३, विशाल जी-४, जी-१२, आयसीसीव्ही - २ |
डॉ. भगवान आसेवार : ९४२००३७३५९, एम. एस. पेंडके : ९८९०४३३८०३ (अखिल भारतीय समन्वयित कोरडवाहू शेती संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.