शेतकरी नियोजन
रब्बीतील विविध पिकांमध्ये योग्य पद्धतीने नियोजन करणे आवश्यक असते. राज्यातील विविध भागांतील अनेक शेतकरी अशा सातत्यपूर्ण चांगल्या व्यवस्थापनातून उत्पादन व दर्जामध्ये चांगली वाढ मिळवत आहेत. अशा शेतकऱ्यांचे अनुभव अन्य शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतात.
नाव : अभिजित पाटील, नांदणी, जि. कोल्हापूर
गेल्या पाच ते सहा वर्षांपासून अभिजित पाटील यांच्याकडे खरीप आणि रब्बीमध्ये उसामध्ये आंतरपीक म्हणून, तर उन्हाळ्यामध्ये स्वतंत्र पीक म्हणून फ्लॉवरची लागवड असते. त्यांच्या अनुभवानुसार केवळ ऊस लागवडीपेक्षा त्यात फ्लॉवरचे आंतरपीक आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. सध्या दीड एकर क्षेत्रातील फ्लॉवरची काढणी पूर्ण झाली असून, पुढील अडीच एकर क्षेत्रातून उत्पादनास सुरवात होत आहे. रब्बी हंगामात फ्लॉवर लागवड करताना मी दर्जेदार उत्पादन देणाऱ्या जातींची लागवड करतो.
विक्रीचे नियोजन : मुंबईसह कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी या स्थानिक बाजारपेठेतही याचबरोबरीने या स्थानिक बाठजारपेठेतही फ्लॉवर पाठवितो. स्थानिक बाजारात नगावर, तर मुंबई बाजारात पोत्यावर फ्लॉवरची विक्री होते. वर्षभरात साधारणत: ८ ते १५ रुपये किलोपर्यंत दर मिळत असल्याचे अभिजित यांनी सांगितले.
संपर्क : अभिजित पाटील, ९४२३३११५८६
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.