तुरीवरील हेलिकोव्हर्पा, शेंगमाशीला रोखा

तूर पिकावर रस शोषणाऱ्या, शेंगा आणि फुलांवर विविध किडींचा प्रादुर्भाव होतो. पिकाच्या कायिक वाढीच्या अवस्थेत होणाऱ्या प्रादुर्भावापेक्षा कळी, फुले व शेंगा अवस्थेमध्ये प्रादुर्भाव झाल्याने जास्त नुकसान होते.
 Pest in pigeon pea
 Pest in pigeon pea

तूर पिकावर रस शोषणाऱ्या, शेंगा आणि फुलांवर विविध किडींचा प्रादुर्भाव होतो. पिकाच्या कायिक वाढीच्या अवस्थेत होणाऱ्या प्रादुर्भावापेक्षा कळी, फुले व शेंगा अवस्थेमध्ये प्रादुर्भाव झाल्याने जास्त नुकसान होते. लक्षणे ओळखून तातडीने उपाययोजना कराव्यात. शेंगा पोखरणारी अळी (हेलीकोव्हर्पा)  कळी, फुले आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत प्रादुर्भाव. पिकाच्या पहिल्या बहारावेळी किडीची अळी जास्त नुकसानकारक. ओळख

  • पतंग पिवळसर रंगाचा असून पुढील तपकिरी पंखाच्या जोडीवर काळे ठिपके आणि कडा धुरकट रंगाच्या असतात. मादी पतंग पीक फुलोऱ्यात आल्यावर कळ्या आणि फुलांवर अंडी घालते. 
  • पूर्ण विकसित अळी पोपटी किंवा हिरव्या रंगाची असते. शरीराच्या बाजूवर तुटक करड्या रेषा आढळून येतात. अळी अवस्था १७ ते २२ दिवसांची असते.
  • नुकसान प्रथम व द्वितीय अवस्थेतील अळी फुले आणि नंतरच्या अवस्थांचा शेंगांवर प्रादुर्भाव दिसून येतो. अळी अर्धी शेंगांच्या आत आणि अर्धी बाहेर राहून दाणे खाते. अळीच्या प्रादुर्भावामुळे शेंगांवर अनियमित आकाराचे मोठे छिद्र दिसून येते. सर्वेक्षण पीक कळी, फुलोरा अवस्थेत आल्यानंतर आठवड्यातून किमान एकदा हेक्टरी १२ ते २४ झाडांचे निरीक्षण करावे. पतंगाच्या सर्वेक्षणासाठी हेक्टरी किमान ५ कामगंध सापळे पिकापेक्षा १ फूट उंचीवर लावावेत. आर्थिक नुकसान पातळी

  • प्रति कामगंध सापळा सतत तीन दिवस नर पतंगाची संख्या ८ ते १० पेक्षा जास्त
  • प्रति झाड १० अळ्या किंवा ५ टक्के प्रादुर्भावग्रस्त शेंगा
  • पिसारी पतंग ओळख 

  • पतंग नाजूक, निमुळता करड्या भुऱ्या रंगाचा. पुढील पंख लांब दुभंगलेले व मागील पंख तीन भागात विभागलेले असून त्यांच्या कडांवर नाजूक केसाची दाट लव असते. 
  • अळी हिरवट रंगाची, मध्यभागी फुगीर व दोन्ही टोकांकडे निमुळती होत गेलेली असते. पाठीवर काटेरी लव असते.
  • नुकसान

  • लहान अळी कळ्या, फुलांना छिद्र करून खाते. मोठी अळी शेंगांवरील साल खरवडून, शेंगांना छिद्र पाडून दाणे खाते. अळी शेंगेच्या आतमध्ये शिरत नाही.
  • पावसाळ्याच्या उत्तरार्धात किडीचा प्रादुर्भाव वाढतो.
  • आर्थिक नुकसान पातळी प्रति १० झाड पाच अळ्या किंवा ५ टक्के प्रादुर्भावग्रस्त शेंगा

    आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास जैविक व्यवस्थापन- (फवारणी प्रति १० लिटर पाणी)

  • निंबोळी अर्क ५ टक्के किंवा
  • बॅसिलस थुरीनजेनेसिस (५ डब्लू.पी.) २० ग्रॅम
  • एचएएनपीव्ही (२.० ए.एस.) १० मिलि
  • हेक्टरी २० ते ५० पक्षी थांबे उभारावेत. 
  • रासायनिक फवारणी (फवारणी प्रति १० लिटर पाणी)

  • थायोडीकार्ब (७५ डब्ल्यूपी) २० ग्रॅम किंवा
  • मिथोमिल (४० एस.पी.) २० ग्रॅम
  • पहिली फवारणी

  • क्विनॉलफॉस (२५ ई.सी.) २५ मिलि किंवा
  • इंडोक्‍झाकार्ब (१४.५ एस.सी.) ८ मिलि किंवा
  • इंडोक्‍झाकार्ब (१५.८ ई.सी.) ६.५ मिलि किंवा
  • लॅंबडा सायहॅलोथ्रीन (५ ई.सी.) १० मिलि
  •   दुसरी फवारणी

  • इमामेक्‍टीन बेंन्झोएट (५ एस.जी.) ४.५ ग्रॅम किंवा
  • क्लोरॲन्ट्रानिलिप्रोल (१८.५ एस.सी.) ३ मिलि किंवा
  • फ्लूबेन्डायअमाइड (३९.३५ एस.सी.) २ मिलि किंवा
  • स्पिनोसॅड (४५ एस.सी.) २ मिलि किंवा
  • क्लोरॲन्ट्रानिलिप्रोल (१८.५ एस.सी.) + लॅमडा सायहॅलोथ्रीन (५ ई.सी.) (संयुक्त कीटकनाशक) ४ मिलि
  • पीक ५० टक्के फुलोरा अवस्थेत असताना पहिली आणि १५ दिवसांनंतर दुसरी फवारणी करावी. 
  • शेंगमाशी ओळख 

  • हिरवट चमकदार रंग, आकाराने अतिशय लहान.
  • मादी हिरव्या शेंगांमध्ये वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये अंडी घालते.
  • अळी पांढऱ्या पिवळसर रंगाची, तोंडाकडील भाग निमुळता व टोकदार असतो.
  • नुकसान 

  • लवकर परिपक्व होणाऱ्या वाणांवर कमी प्रादुर्भाव, मध्यम कालावधीच्या वाणांवर मध्यम स्वरूपाचा तर उशिरा परिपक्व होणाऱ्या वाणांवर जास्त प्रादुर्भाव.
  • लहान आकाराच्या शेंगांपेक्षा मोठ्या शेंगांमध्ये जास्त प्रादुर्भाव.
  •  शेंगेच्या आत राहून अळी शेंगातील दाणे अर्धवट कुरतडून खाते. प्रादुर्भावग्रस्त दाण्यांवर बुरशीची वाढ होते.
  •  बुरशीग्रस्त दाणे खाण्यासाठी किंवा लागवडीसाठी अयोग्य. प्रादुर्भावग्रस्त बियाण्याची लवकर उगवण होत नाही.
  • आर्थिक नुकसान पातळी शेंगा भरण्याच्या अवस्थेत पाच टक्के प्रादुर्भावग्रस्त शेंगा आढळल्यास योग्य व्यवस्थापन करावे. रासायनिक नियंत्रण ः (फवारणी प्रति १० लिटर पाणी)

  • अझाडीरेक्टीन (३०० पीपीएम) ५० मिलि किंवा
  • क्विनॉलफॉस (२५ टक्के ईसी) २५ मिलि किंवा
  • लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (५ टक्के ईसी) १० मिलि किंवा
  • डेल्टामेथ्रिन (२.८ टक्के ईसी) १० मिलि किंवा
  • लुफेन्युरॉन (५.४ टक्के ईसी) १२ मिलि किंवा
  • इंडोक्झाकार्ब (१४.५ टक्के एससी) ८ मिलि किंवा
  • इंडोक्झाकार्ब (१५.८ टक्के ईसी) ६.५ मिलि
  • शेंगावरील ढेकूण ओळख हिरवट तपकिरी रंग. छातीच्या बाजूला अणकुचीदार काटे असतात. नुकसान

  • पिल्ले व प्रौढ कोवळ्या शेंगांतील रस शोषतात.
  • प्रादुर्भावग्रस्त दाण्यांवर चट्टे उमटून प्रत खराब होते. शेंगा अपरिपक्व अवस्थेत वाळून जातात.
  •  प्रादुर्भावग्रस्त बियाणे पेरणी आणि खाण्यासाठी योग्य नसते.
  • व्यवस्थापन  शेंगमाशीसाठी केलेल्या रासायनिक फवारणीमुळे या किडीचे नियंत्रण होते.  एकात्मिक व्यवस्थापन

  • उन्हाळ्यात जमिनीची खोल नांगरट करावी. जेणेकरून जमिनीतील किडींच्या अवस्था नष्ट होतील.
  • आयसीपीएल ३३२ सारख्या कीडप्रतिबंधक जातीची लागवड करावी.
  • तूर पिकासोबत मूग, उडीद, सोयाबीन, मका किंवा ज्वारी सारख्या पिकांची लागवड केल्यास किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
  • हेक्टरी किमान वीस पक्षी थांबे उभारावेत.
  • तुरीवरील शेंगा पोखरणारी अळी (हेलिकोव्हर्पा) सर्वेक्षणासाठी एकरी २ कामगंध सापळ्यांचा वापर प्रभावी ठरतो. प्रति कामगंध सापळ्यात सतत तीन दिवस ८ ते १० नर पतंग आढळून आल्यास त्याला आर्थिक नुकसानीची पातळी समजता येईल.
  • एकच फवारणी करण्यापेक्षा कीटकनाशकांच्या दोन फवारण्या केल्यास प्रादुर्भाव कमी होतो. दुसरी फवारणीवेळी कीटकनाशकात बदल करावा.
  • शेंगा धरण्याच्या अवस्थेत पहिली आणि त्यानंतर १५ दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी करावी.
  • संपर्क- डॉ. राहुल वडस्कर, ९९२२९ ३४९४९ डॉ. व्ही. जे. तांबे, ७५८८९६२२०६ (कीटकशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय, नागपूर)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com