ट्रायकोग्रामा शेतातील पिकांचे कुठलेही नुकसान करीत नाही. हा कीटक पिकावर असणाऱ्या बोंडअळ्याचे अंडे शोधून त्यामध्ये स्वतःचे अंडे टाकतो.अशा पद्धतीने कीड नियंत्रणासाठी मदत होते. ट्रायकोग्रामा हा एक परोपजीवी कीटक पतंग वर्गीय कीटकांची अंडी नष्ट करतो. कापसावरील ठिपक्याची बोंडअळी, हेलिकोवर्पा (अमेरिकन बोंडअळी) आणि गुलाबी बोंडअळी यांच्या अंड्याचा नाश ट्रायकोग्रामा करतो. याचबरोबरीने तुरीवरील शेंगा पोखरणारी अळी,उसावरील खोडकिडास, टोमॅटो, भेंडी, वांग्यावरील फळ पोखरणारी अळी, भुईमूग, सूर्यफुलावरील अळी भात, ज्वारी, मका या पिकावरील येणारे पतंग वर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी उपयुक्त आहे. याचबरोबरीने धान्य, भाजीपाला आणि फळ झाडावरील कीटकांच्या अंड्याचा नाश ट्रायकोग्रामाच्या विविध प्रजाती करतात. अशी आहे कार्यपद्धती
ट्रायकोकार्ड वापरण्याचे प्रमाण
टीप- ट्रायकोकार्डचे प्रसारण केल्यानंतर रासायनिक कीडनाशकांचा वापर टाळावा. ट्रायकोकार्ड विषयी
निसर्गात आढळणारे अनेक मित्र कीटक क्रायसोपा, लेडीबर्ड बीटल (ढालकिडा), ब्रॅकॉन, अॅपॅनटीलीस, पेंटॅटोमिड ढेकूण, मॅन्टिड, भक्षक कोळी, क्रिप्टोलिमस, सिरफिड माशी, कॅम्पोलेटीस, कॅरोप्स, इक्निमोनिड, रोगस असे अनेक मित्र कीटक निसर्गात आढळून येतात. या मित्र कीटकांची ओळख करून घ्यावी. हे मित्र कीटक शेतामध्ये दिसल्यास किडीच्या नियंत्रणासाठी रासायनिक कीडनाशकांचा वापर शक्यतो टाळावा. संपर्क- डॉ. शिवाजी तेलंग, ९४२१५६९०१८ (कापूस संशोधन केंद्र, नांदेड)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.