पावसाळ्यात द्राक्षबागेतील किडीचा प्रादुर्भाव, उपाययोजना

खोडकिडीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी वर्षातून फक्त १५ दिवसच काम करण्याची गरज आहे. एप्रिल छाटणीनंतर मान्सूनपूर्व कालावधीत द्राक्षवेलीवरची संपूर्ण ढिली किंवा सुटलेली साल हाताने काढून घ्यावी. साल काढण्यामुळे दोन फायदे होतात. एकतर खोडकिडीला सालीखाली लपण्यासाठी जागा मिळणार नाही. कीटकनाशक फवारणीदरम्यान खोड आणि ओलांडे चांगले धुतले जातात.
grapes advisory
grapes advisory

खोडकिडीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी वर्षातून फक्त १५ दिवसच काम करण्याची गरज आहे. एप्रिल छाटणीनंतर मान्सूनपूर्व कालावधीत द्राक्षवेलीवरची संपूर्ण ढिली किंवा सुटलेली साल हाताने काढून घ्यावी. साल काढण्यामुळे दोन फायदे होतात. एकतर खोडकिडीला सालीखाली लपण्यासाठी जागा मिळणार नाही. कीटकनाशक फवारणीदरम्यान खोड आणि ओलांडे चांगले धुतले जातात.​

खोडकीड

  • स्ट्रोमॅशिअम बारबॅटम या खोडकिडीचे प्रौढ भुंगेरे साधारणतः मॉन्सूनपूर्व, जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात खोडातून तसेच ओलांड्यातून बाहेर येतात. बाहेर आल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मादी भुंगेरे मुख्यतः सैल सालीच्या आत, खोडावर तसेच ओलांड्यावर एकेक किंवा पुंजक्याने अंडी द्यायला सुरुवात करते.
  • अळी खोड पोखरत आत जाते. बोगदा तयार करते. भुसा/ पावडर बाहेर न टाकता बोगद्यातच ठासून भरते. परिणामी, शेतकऱ्यांना प्रादुर्भाव सहजासहजी कळून येत नाही.
  • पोखरलेले खोड ठिसूळ होऊन लवकर मोडते. साधारणपणे २ ते ३ वर्षांत या किडीच्या प्रादुर्भावामुळे द्राक्ष पिकाच्या उत्पादनक्षमतेत ५० टक्क्यांपेक्षा अधिक घट होते.
  • खोडकिडीच्या नियंत्रणासाठी

  • या खोडकिडीच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांनी वर्षातून फक्त १५ दिवसच काम करण्याची गरज आहे. एप्रिल छाटणीनंतर मान्सूनपूर्व कालावधीत द्राक्षवेलीवरची संपूर्ण ढिली किंवा सुटलेली साल हाताने काढून घ्यावी. साल काढण्यामुळे दोन फायदे होतात. एकतर खोडकिडीला सालीखाली लपण्यासाठी जागा मिळणार नाही. कीटकनाशक फवारणीदरम्यान खोड आणि ओलांडे चांगले धुतले जातात.
  • मॉन्सूनपूर्व किंवा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून बागेजवळ १ प्रकाश सापळा प्रतिएकर लावावा. या सापळ्याकडे खोड किडीचे भुंगेरे आकर्षित होतात.
  • प्रकाश सापळ्यात भुंगेरे येत असल्याचे आढळल्यास मॉन्सूनपूर्व, जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ३ ते ४ दिवसांच्या अंतराने पुढीलपैकी कीटकनाशकाने ५ ते ६ वेळा खोड आणि ओलांडे चांगले धुवून घ्यावेत.
  • फवारणी प्रमाण प्रतिलिटर पाणी

  • लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (४.९ सीएस) ०.५ मिली किंवा
  • फिप्रोनील (८० डब्ल्यू पी) ०.०६२५ ग्रॅम किंवा
  • इमिडाक्लोप्रिड (१७.८ एस एल) ०.३ मिली/किंवा
  • मिथोमिल (४० एस पी) १ मिली.
  • डर्व्हिशिया कडंबी (नवीन लाल अळी)

  • या किडीचा मादी पतंग अंडी जुलै - ऑगस्ट महिन्यात मुख्यतः सैल सालीच्या आत, खोडावर तसेच ओलांड्यावर पुंजक्याच्या स्वरूपात घालतो.
  • या अळीच्या सुरुवातीच्या अवस्था खोडावर आणि शेवटच्या अवस्था खोडाला छिद्र पाडून आतमध्ये शिरतात. परिणामी झाड एका वर्षातच अनुत्पादक होते.
  • उपाययोजना

  • डर्व्हिशिया कडंबी अळीच्या नियंत्रणासाठी ढिली झालेली साल काढून घेणे गरजेचे आहे.
  • एकरी एक या प्रमाणात प्रकाश सापळा बागेबाहेर लावावा. या किडीचे पतंग प्रकाशाकडे अधिक आकर्षित होतात.
  • मेटारायझियम बुरशीची ३ ते ५ मि.लि. प्रती लिटर या प्रमाणात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महिन्यातून १ ते २ वेळा फवारणी करावी, त्यामुळे काही प्रमाणात कीड नियंत्रित होते.
  • रासायनिक नियंत्रणासाठी, साल काढल्यानंतर लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (४.९ सी एस) २.५ मिली प्रती लिटर या प्रमाणे घेऊन फक्त खोड आणि ओलांडे चांगले धुवून घ्यावेत.
  • मिलीबग

  • मिलीबगचा प्रादुर्भाव जास्त तापमानामुळे एप्रिल मे महिन्यात कमी असतो, थोडा फार मिलीबग असतो तो सालीच्या आत लपून बसलेला असतो.
  • मे महिन्यांनंतर तापमान कमी होऊन ढगाळ वातावरण तयार होते तसा मिलीबगचा प्रादुर्भाव वाढत जातो.
  • पावसाळ्याच्या कालावधीत मिलीबग नियंत्रणासाठी कोणतेही रासायनिक कीटकनाशक फवारण्याची गरज नाही. कारण या कालावधीत आर्द्रता जास्त असल्याने मिलीबगला खाणाऱ्या नैसर्गिक शत्रू किडींची संख्या वाढते. ते मिलीबगला नियंत्रित करतात.
  • मेटारायझिम किंवा लेकॅनी सिलियम बुरशी ३ ते ५ मि.लि. प्रती लिटर या प्रमाणात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वापर करावा. आपल्याला चांगले नियंत्रण मिळेल.
  • स्पोडोप्टेरा लिट्यूरा

  • आर्द्रता वाढल्यावर स्पोडोप्टेरा अळीचा प्रादुर्भाव दिसून येईल.
  • प्रकाश सापळ्यात या किडीचे पतंग जास्तीत जास्त आकर्षित होतात.
  • पावसाळ्यात आपण या अळीला नियंत्रित केले तर फळ छाटणीनंतर हिचा प्रादुर्भाव जास्त दिसणार नाही.
  • स्पोडोप्टेरा अळीचा जर जास्त प्रादुर्भाव दिसून येत असेल तर, रासायनिक नियंत्रण - फवारणी प्रती लिटर पाणी

  • इमामेक्टिन बेन्झोएट ०.२२ ग्रॅम किंवा
  • फिप्रोनिल ०.०६२५ ग्रॅम किंवा
  • सायअॅण्ट्रानिलीप्रोल ०.७ मिली
  • उडद्या

  • गेल्या काही वर्षांपासून नाशिक विभागात उडद्या भुंगेऱ्यांचा जास्त प्रादुर्भाव दिसून येत आहे. तो रासायनिक कीटकनाशकाने नियंत्रित होत नसल्याचे द्राक्ष बागायतदारांचे म्हणणे आहे. त्याचे कारण म्हणजे या किडीची अळी अवस्था जमिनीमध्ये असते. आपण झाडावर केलेल्या फवारणीमुळे प्रौढ भुंगेरे नियंत्रित होऊ शकतात. मात्र, जमिनीतील अळीचे भुंगेरे तयार झाल्यावर ते पुन्हा बागेचे नुकसान करतात. परिणामी, आपल्याला पुन्हा पुन्हा फवारणी करण्याची गरज भासेल. उडद्याचे हे चक्र असेच चालू राहील. त्यासाठी आपल्याला जमिनीतील अळीचे नियंत्रण करणे गरजेचे आहे.
  • पावसाळ्याच्या कालावधीत तण वाढणे, आर्द्रता, ओली माती, सेंद्रिय कर्ब जास्त प्रमाणात असल्याने उडद्याच्या अळीचे पुनरुत्पादन आणि वाढ चांगली होते.
  • उपाययोजना 

  • महिन्यातून एकदा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मेटारायझिम बुरशीचे ठिबकद्वारे ड्रेंचिंग करावे (एकरी प्रमाण - २ लिटर). या किडीला चांगला आळा बसेल.
  • पावसाळ्यात या अळीला नियंत्रित केल्यास फळ छाटणीनंतर हिचा प्रादुर्भाव जास्त दिसणार नाही.
  • संपर्क- डॉ. दीपेंद्र सिंह यादव, ०२०-२६९५६०३५ (राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र, पुणे.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com