भाजीपाल्यामध्ये मिरची, टोमॅटो आणि वांगी अशा पिकांची रोपे आधी गादीवाफ्यावर तयार करून घ्यावीत. आपल्या पिकाच्या लागवडीनुसार योग्य आकाराची रोपवाटिका तयार करावी.
भाजीपाला उत्पादनवाढीसाठी सशक्त, निरोगी आणि जोमदार रोपे हीच रोपवाटिकेच्या यशाच्या महत्त्वाच्या बाबी आहेत. गादी वाफा निर्मितीसाठी भुसभुशीत वाफा तयार करणे फायदेशीर ठरते. प्रत्येक गादीवाफा १५ फूट लांबीचा आणि ३ फूट रुंदीचा व १/२ फूट उंचीचा गादी वाफा तयार करावा. गादी वाफा तयार करताना चांगल्या उत्कृष्ट कुजलेले शेणखतामध्ये ५०० ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर मिसळून गादी वाफ्यामध्ये समांतर अंथरावे. ५ किलो सिंगल सुपर फॉस्फेट भुकटी, २०० ग्रॅम निंबोळी खत, ५०० ग्रॅम १५ :१५ :१५ आणि ५० ग्रॅम कार्बेन्डाझिम एकत्र मिसळून गादी वाफ्यावर पसरून घ्यावेत. वाफा भुसभुशीत करावा. वाफ्याला रोज हलके पाणी देऊन ओलावून घ्यावे. वापसा आल्यानंतर वाफ्यावर रेषा ओढून बियाणे काळजीपूर्वक टोकावे. बियाणे पेरताना घ्यावयाची काळजी
: श्रीकांत खैरनार, ८८०५७५७५२७ (महाराष्ट्र विज्ञानवर्धिनी, आघारकर संशोधन संस्था, पुणे)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.