चिकुमधील फांदीमर, पानावरील करपा रोगांचे नियंत्रण

 चिकू पानावरील करपा
चिकू पानावरील करपा

येत्या काही दिवसात पावसाळी वातावरणामुळे चिकु पिकात फांदीमर व पानावरील करपा हे दोन मुख्य रोग येण्याची शक्यता आहे. या रोगांमुळे चिकुचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे त्यांच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करावयात.

फांदीमर रोगकारक बुरशी : बोट्रीओडीप्लोडीया थीओब्रोमी लक्षणे : बुरशीचा प्रादुर्भाव फांदीवर आढळून येतो. प्रादुर्भावग्रस्त फांद्यांची पाने सुकतात व गळून पडतात. बुरशीचा प्रसार फांदीच्या टोकाकडून मागे पसरत असल्याने फांदी टोकाकडून मरते. उपाय :  रोगट फांद्या कापून नष्ट कराव्यात. कापलेल्या जागी १० टक्के बोर्डो पेस्ट लावावी. बोर्डो मिश्रणाची (१ टक्के) फवारणी करावी.

पानावरील करपा लक्षणे : प्रादुर्भावग्रस्त पानांवर तपकिरी चट्टे दिसून येतात. नंतर हे चट्टे राखेच्या रंगासारखे होतात. चट्ट्यामधील भागातील पानांची अन्न तयार करण्याची क्रिया मंदावते. परिणामी उत्पादनात घट आढळते. उपाय : झाडावर १ टक्का बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. रोगट फांद्या कापून नष्ट कराव्यात. कापलेल्या जागी १० टक्के बोर्डो पेस्ट लावावी.

संपर्क : ए. एस. ढाणे, ७०२८०६५६२६ (कृषि संशोधन केंद्र, पालघर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com