राज्यात उष्ण, ढगाळ हवामान

सोमवार ते बुधवारपर्यंत (ता.१९ ते २१) १००८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. त्यामुळे कमी हवेच्या दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. तसेच त्यापुढेही महाराष्ट्रावरील हवेचे दाब १००८ हेप्टापास्कल इतके कमी राहतील.
weekly weather
weekly weather

सोमवार ते बुधवारपर्यंत (ता.१९ ते २१) १००८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. त्यामुळे कमी हवेच्या दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. तसेच त्यापुढेही महाराष्ट्रावरील हवेचे दाब १००८ हेप्टापास्कल इतके कमी राहतील. त्यामुळे संपूर्ण आठवडाभर ढगाळ हवामान राहण्याची शक्‍यता आहे. आज महाराष्ट्रावर हवेचा दाब १०१० हेप्टापास्कल इतका राहील. सोमवार ते बुधवारपर्यंत (ता.१९ ते २१) १००८ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहील. त्यामुळे कमी हवेच्या दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. तसेच त्यापुढेही महाराष्ट्रावरील हवेचे दाब १००८ हेप्टापास्कल इतके कमी राहतील. त्यामुळे संपूर्ण आठवडाभर ढगाळ हवामान राहण्याची शक्‍यता आहे. कमी हवेच्या दाबाचे क्षेत्र निर्माण होणाऱ्या भागात पावसाची शक्‍यता आहे. संपूर्ण विदर्भात कमाल तापमान ४० अंशांहून अधिक राहील. विशेषतः चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ते ४३ अंश सेल्सिअस, तर गोंदिया जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअसपर्यंत वाढेल. विदर्भात किमान तापमानही २७ ते २८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे उष्ण लहरी आणि उष्णतेच्या लाटा जाणवतील. त्या प्रामुख्याने पश्‍चिम व मध्य विदर्भात तसेच पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांत प्रकर्षाने जाणवतील. मराठवाड्यातील बीड, जालना जिल्ह्यांत, पश्‍चिम महाराष्ट्रातील सोलापूर, पुणे, नगर व जळगाव जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी १५ ते १६ किमी इतका अधिक राहील. हवामान अत्यंत कोरडे उष्ण व ढगाळ राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने आग्नेयेकडून राहील. त्यामुळे पावसाची शक्‍यता निर्माण होईल. कोकण  कमाल तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस, तर रायगड, ठाणे जिल्ह्यांत ३६ ते ३७ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व ठाणे जिल्ह्यांत किमान तापमान २६ अंश सेल्सिअस, तर रायगड जिल्ह्यात २४ अंश सेल्सिअस राहील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८१ ते ८८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २२ ते ३१ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ८ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. उत्तर महाराष्ट्र  नाशिक जिल्ह्यात कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअस राहील. धुळे, नंदूरबार व जळगाव जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील. नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत किमान तापमान २५ अंश सेल्सिअस, तर जळगाव जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता जळगाव जिल्ह्यात ३४ टक्के, तर नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ४९ ते ६१ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १३ ते १८ टक्के राहील. धुळे व जळगाव जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १६ ते १८ टक्के राहील. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. मराठवाडा  कमाल तापमान नांदेड जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस, परभणी, हिंगोली, जालना व औरंगाबाद जिल्ह्यात ३९ अंश सेल्सिअस राहील. उस्मानाबाद, लातूर व बीड जिल्ह्यांत ते ३८ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस राहील. तर उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यांत ते २७ अंश सेल्सिअस राहील. औरंगाबाद जिल्ह्यात ते २३ अंश सेल्सिअसपर्यंत कमी राहण्याची शक्‍यता आहे. आकाश अंशतः ढगाळ राहील. उस्मानाबाद, लातूर, नांदेड व बीड जिल्ह्यांत सकाळची सापेक्ष आर्द्रता ३० ते ३३ टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १२ ते १५ टक्के राहील. त्यामुळे हवामान अत्यंत कोरडे व उष्ण राहील. वाऱ्याचा ताशी वेग बीड व जालना जिल्ह्यात १५ ते १६ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने नैॡत्येकडून राहील. पश्‍चिम विदर्भ  कमाल तापमान सर्वच जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस राहील. तसेच किमान तापमान २८ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २० ते २३ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता १३ ते १४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ८ ते १३ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा नैॡत्येकडून राहील. हवामान अत्यंत कोरडे व उष्ण राहील. मध्य विदर्भ   मध्य विदर्भातील यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यांत कमाल तापमान ४० अंश सेल्सिअस राहील. यवतमाळ जिल्ह्यात किमान तापमान २८ अंश सेल्सिअस, तर वर्धा व नागपूर जिल्ह्यांत २७ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता २४ ते ३० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता १३ ते १४ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. पूर्व विदर्भ  कमाल तापमान चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ४३ अंश सेल्सिअस,  गोंदिया जिल्ह्यात ४२ अंश सेल्सिअस, तर भंडारा जिल्ह्यात ४० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान भंडारा जिल्ह्यात २६ अंश सेल्सिअस, तर गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता भंडारा व गोंदिया जिल्ह्यात २६ ते २७ टक्के, तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यात ३७ ते ४८ टक्के राहील. सर्वच जिल्ह्यांत दुपारची सापेक्ष आर्द्रता १३ ते १६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते ८ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून राहील. पश्‍चिम-दक्षिण महाराष्ट्र  कमाल तापमान सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ३८ अंश सेल्सिअस तर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात ३६ ते ३७ अंश सेल्सिअस राहील. सातारा जिल्ह्यात ते ३५ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सोलापूर जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांत २५ अंश सेल्सिअस राहील. तर सातारा जिल्ह्यात ते २२ अंश सेल्सिअस आणि पुणे, नगर जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस राहील. सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ३७ ते ६५ टक्के, तर दुपारची १२ ते १९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत १५ ते १९ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील. कृषी सल्ला 

  • फळबागेतील फळगळ टाळण्यासाठी तसेच फळांचा आकार वाढण्यासाठी गरजेनुसार पाणीपुरवठा करावा. ठिबक सिंचनाचा कालावधी वाढवावा. पाटाने पाणी देताना पाण्याच्या दोन पाळ्यांतील अंतर कमी करावे.
  • फळबागेत आच्छादनाचा वापर करावा.
  • हळद व आले लागवडीसाठी जमिनीची पूर्वमशागत करा.
  • उन्हाच्या तीव्रतेपासून संरक्षण होण्यासाठी जनावरांना पुरेसा निवारा उपलब्ध करावा. गोठा हवेशीर असावा. गोठ्यामधून गरम हवा बाहेर जाण्यासाठी व थंड हवा आत येण्यासाठी जागा असावी.
  • - (ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ व सदस्य, ॲग्रिकल्चर मेटरॉलॉजी फोरम फॉर साउथ आशिया.)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com