सीताफळ प्रक्रियेतून वाढवा फायदा

सीताफळ प्रक्रिया
सीताफळ प्रक्रिया

सीताफळाच्या गरापासून पावडर, जॅम, पेय, सिरप, मिल्कशेक, रबडी, आइस्क्रिम, श्रीखंड हे पदार्थ तयार करता येतात. सीताफळाच्या पदार्थांना स्थानिक तसेच परदेशी बाजारपेठांत चांगली मागणी आहे. त्यामुळे गावपातळीवरील बचत गटांमार्फत बाजारपेठेतील मागणीनुसार विविध पदार्थ तयार करणे शक्‍य आहे.

सीताफळ गराचा आइस्क्रिम तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. गरापासून जॅम, जेली, पावडर, टॉफी, श्रीखंड, रबडी, मिल्कशेक व बेकरी पदार्थांमध्ये केला जातो. गर नियमित सेवन केल्याने अशक्तपणा दूर होतो. फळाचा गर तृष्णावर्धक, बलवर्धक, उत्साहवर्धक, शुक्राणूवर्धक, पचनशक्ती वाढविणारा अाणि पित्ताविकार कमी करणारा आहे.

गर काढून साठविणे

  • पिकलेल्या निरोगी सीताफळांचे दोन भाग करावेत. गर अलगदपणे चमच्याने काढून बिया वेगळ्या कराव्यात.
  • गर मिक्सरमध्ये बारीक करून स्टेनलेस स्टीलच्या पातेल्यात घ्यावा. त्यामध्ये ५०० पीपीएम ऍस्कॉर्बिक आम्ल व ७०० पीपीएम पोटॅशियम मेटाबायसल्फाईट मिसळून गरम करावा.
  • गर निर्जंतुक केलेल्या बाटल्यांमध्ये किंवा पाऊचमध्ये भरून हवाबंद करावा. परत पाश्‍चराइज करून, थंड करून, लेबल लावून, थंड ठिकाणी (शीतगृहात) साठवून ठेवाव्यात.
  • गर साठवण कालावधीमध्ये काळा पडण्याची शक्‍यता असते. म्हणून तो थंड तापमानाला ठेवावा.
  • या पद्धतीशिवाय गरामध्ये ५०० पीपीएम ऍस्कॉर्बिक आम्ल व ७०० पीपीएम केएमएम मिसळून तो उणे २० अंश सेल्सिअस तापमानास गोठवून ठेवल्यास एक वर्षापर्यंत चांगला राहतो.
  • गर विविध पदार्थ तयार करण्यासाठी वर्षभर वापरता येतो. गोठविलेल्या सीताफळाच्या गरास स्थानिक तसेच परदेशी बाजारपेठांत चांगली मागणी आहे.
  • गराची पावडर

  • फळाचा गरामध्ये ५०० पीपीएम ऍस्कॉर्बिक आम्ल व ७०० पीपीएम पोटॅशियम मेटाबायसल्फाइट व २ ते ३ टक्के माल्टो डेक्‍स्ट्रीन मिसळून स्प्रे ड्रायरमध्ये किंवा ड्रम ड्रायरमध्ये ५ ते ८ टक्के पाण्याचा अंश येईपर्यंत वाळवावा.
  • यानंतर तयार झालेली पावडर निर्वात केलेल्या पिशवीमध्ये भरून, थंड ठिकाणी साठवून ठेवावी.
  • अशाप्रकारे तयार केलेली पावडर आइस्क्रिम, श्रीखंड, मिल्कशेक, टॉफी इत्यादी पदार्थ तयार करताना वापरता येते.  
  • सीताफळातील गर, बिया वेगळ्या करण्यासाठी यंत्र अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी प्रक्रिया अभियांत्रिकी विभागातील तज्ज्ञांनी पंदेकृवी सीताफळ गर व बीज निष्काजन यंत्र विकसित केले अाहे. या यंत्रामधून काढलेल्या गरामध्ये पाकळ्या अखंड राहत असल्यामुळे गराला चांगला बाजारभाव मिळतो. त्यामुळे सीताफळ बाजारात कमी भावात न विकता त्याचा गर काढून विकल्यामुळे सीताफळाचे चांगले मूल्यवर्धन होते. यंत्राची वैशिष्ट्ये

  • या यंत्राची गर निष्काजन क्षमता ९२ ते ९६ टक्के अाहे.
  • गरामध्ये ७५ ते ८५ टक्के पाकळ्या राहतात.
  • यंत्राची क्षमता ७० ते ८० किलो प्रतितास अाहे.
  • यंत्र ०.५ अश्वशक्तीच्या सिंगल फेज विद्युत मोटारवर चालते.
  • गर वेगळा करण्याची प्रक्रिया :

  • पिकलेल्या सीताफळाचे दोन भाग करून साल वेगळी करावी.
  • मोठ्या अाकाराच्या चमच्याने गर बियांसहित यंत्राच्या फिडिंग चाडीमध्ये टाकावा. यंत्राच्या गर व बीज निष्काजन रोलर या प्रमुख यंत्रणेद्वारे गर व बिया वेगळ्या होतात.
  • ब्रश रोलरद्वारे चांगल्या प्रतीच्या पाकळ्यांसहित गर वेगळा केला जातो व तो खालील भागात गर निष्काजन मार्गाने वेगळा केला जातो. तर दंडगोलाकृती चाळण्याद्वारे बिया वेगळ्या केल्या जातात.
  • यंत्राचे फायदे :

  • हे यंत्र चालवण्यास सुलभ व हाताळण्यास सोपे अाहे. अकुशल किंवा कुशल मजुराकडून हे यंत्र चालविता येते.
  • गर वेगळे करण्याची प्रक्रिया जलद होत असल्याने गर लगेच पॅक करून डीप फ्रीजरमध्ये साठवता येतो. त्यामुळे गराचा रंग बदलत नाही.
  • गर काढण्याच्या प्रक्रियेत मानवी हाताळणी कमी असल्याने गराची प्रत चांगली राहते.
  • गर अारोग्यास पोषक अशा स्थितीत काढला जातो. फळांच्या काढणीपश्चात कमी प्रमाणात नुकसान होते.
  • मोठ्या प्रमाणात मिळालेल्या सीताफळाच्या सालीचा उपयोग सेंद्रिय खतनिर्मितीसाठी करता येतो. तसेच बिया रोप निर्मितीसाठी किंवा अाैषधे तयार करण्यासाठी वापरता येतात. (स्त्रोत ः www.pdkv.ac.in)
  • दिप्ती पाटगावकर, pckvkmau@gmail.com (कृषी विज्ञान केंद्र, अाैरंगाबाद)  

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com