पूर्व-शीतकरणाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे पीक काढल्यानंतर त्यातील उष्णता (फील्ड हीट) काढून टाकणे. त्याचबरोबर,पूर्व-शीतकरण विविध सूक्ष्मजिवांच्या वाढीस प्रतिबंध करते, ज्याजोगे काढणीनंतरच्या नाशवंत घटकांचा प्रभाव कमी होतो. पूर्व-शीतकरण उत्पादनांच्या श्वसनाचा दर कमी करते आणि त्याचे साठवण आयुष्य वाढवते. ताजी, दर्जेदार फळे आणि भाज्या यांचा ग्राहकाला पुरवठा करण्यासाठी काढणीनंतरचे व्यवस्थापन महत्वाचे आहे. काढणीनंतर पूर्व-शीतकरण (प्री-कुलिंग) ही महत्वाची प्रक्रिया आहे. काढणी केलेल्या पिकांचे तापमान आणि थंड साठवण यात बराच फरक आहे. त्यामुळे पूर्व-शीतकरणाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे पीक काढल्यानंतर त्यातील उष्णता (फील्ड हीट) काढून टाकणे. त्याचबरोबर,पूर्व-शीतकरण विविध सूक्ष्मजिवांच्या वाढीस प्रतिबंध करते, ज्याजोगे काढणीनंतरच्या नाशवंत घटकांचा प्रभाव कमी होतो. पूर्व-शीतकरण उत्पादनांच्या श्वसनाचा दर कमी करते आणि त्याचे साठवण आयुष्य वाढवते.
पूर्व-शीतकरणाची गरज
पूर्व शीतकरणाच्या पद्धती रूम कुलिंग
फोर्सड् एअर कुलिंग स्टोरेज चेंबरमध्ये थंड हवेचा वेगाने प्रसार करून उष्णता (फील्ड हीट) काढून टाकली जाते. हायड्रो कुलिंग ही एक अत्यंत प्रभावी पूर्व शीतकरण पद्धत आहे. या पद्धतीमध्ये फळे व भाज्यांवर थंड पाण्याने फवारणी केली जाते किंवा ती थंड पाण्यात बुडवली जातात. याचा फायदा म्हणजे पाण्याच्या वापरामुळे फळे व भाज्या स्वच्छ होतात. व्हॅक्यूम कुलिंग या पद्धतीत फळे व भाज्या एका एअर टाईट चेंबरमध्ये ठेवतात. अशा प्रकारे हवेचा दबाव कमी होतो. पिकांच्या ओलाव्याचे काही प्रमाणात बाष्पीभवन होते. पाण्याचे बाष्पीभवन करण्यासाठी जास्त प्रमाणात उष्णता आवश्यक असल्याने ही पद्धत पूर्व शीतकरणाचा सर्वात जलद मार्ग आहे. पालेभाज्यांसाठी ही अत्यंत प्रभावी पद्धत आहे. आइस कुलिंग
पूर्व शीतकरणाचे फायदे
संपर्क : स्नेहा सरवदे,९४२३३४४७७२, (अन्न आणि प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग, आदित्य कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, बीड)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.