
भारतीय कृषी संशोधन परिषदने शेळीच्या दुधापासून बिस्किटे, श्रीखंड, पनीर, आइस्क्रीम तयार केले आहे. परदेशामध्ये शेळीच्या दुधापासून तयार केलेले पेटा, पिकोरिना हे पदार्थ लोकप्रिय आहेत.
शेळीचे दूध आरोग्यदायी आणि पचायला हलके आहे. आहार मूल्याच्या दृष्टीने औषधी समजले जाते. एक परिपूर्ण सकस आहार म्हणून शेळीचे दूध महत्त्वाचे आहे. भारतासारख्या उष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये शेळीच्या २७ प्रकारच्या जाती आढळतात. देशी शेळी एका वेतात साधारणपणे ६० लिटर दूध देते. आपल्या राज्यातील उस्मानाबादी आणि संगमनेरी शेळी प्रसिद्ध आहे. सानेनसारख्या विदेशी जातीपासून संकर केलेली शेळी एका वेतात सुमारे ३०० लिटरपर्यंत दूध देते. जागतिक दूध उत्पादनामध्ये शेळीचे दूध हे २ टक्के आहे. शेळीपालन हा वेगाने वाढणारा कृषिपूरक व पर्यावरणपूरक दुग्ध व्यवसाय आहे. दुधाचे आरोग्यदायी फायदे
- अमृता राजोपाध्ये-कुलकर्णी, ७२१८३२७०१०
(कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, नारायणगाव, जि. पुणे)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.