पिकलेल्या टोमॅटोची साठवण क्षमता कमी असते. संपूर्ण पिकलेली फळे २ ते ३ दिवसांत वापरण्यात आली नाहीत तर ती आंबट होतात, मऊ होतात आणि लवकर खराब होतात. त्यामुळे टोमॅटोपासून केचप, सॉस, सूप, प्युरी असे विविध मूल्यवर्धित पदार्थ बनवून चांगला आर्थिक फायदा मिळवता येतो. टोमॅटो ही रोजच्या आहारातील एक महत्त्वाची फळभाजी असून, त्याचा वापर सांबर, वरण व इतर मिश्र भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. टोमॅटोपासून केचप, सॉस, सूप, प्युरी या प्रक्रियायुक्त पदार्थांना बाजारपेठेत मोठी मागणी अाहे. प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करताना लोखंडी भांड्याचा वापर करू नये. त्यामुळे पदार्थ काळसर पडून तो खराब होतो. टोमॅटो प्युरी
सूप ः साहित्य ः रस १ किलो, पाणी ३५० मिलि, कांदा १५ ग्रॅम, मीठ २० ग्रॅम, लोणी २० ग्रॅम, साखर २० ग्रॅम, लसूण, काळे मिरे, दालचिनी, इलायची व लवंग प्रत्येकी २ ग्रॅम.
टोमॅटो लोणचे ः साहित्य १ किलो टोमॅटो, मोहरीडाळ १०-१५ ग्रॅम, मेथीडाळ १० ग्रॅम, आले-लसूण पेस्ट ५० ग्रॅम, मीठ चवीनुसार, हळद, तिखट, तेल मोहरी १५० मिलि, व्हिनेगर १५ मिलि.
संपर्क ः चंद्रकला सोनवणे, ८४०८९७०९३७ (एस. के. (काकू) अन्नतंत्र महाविद्यालय, बीड)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.