हळदीचा वापर औषधोपचारामध्ये चांगल्या प्रकारे होते. जखमेवर उपचार तसेच हळद मिसळलेले दूध प्यायल्यामुळे सर्दी, खोकल्यासारखे आजार लगेच बरे होतात. आयुर्वेद शास्त्रानुसार हळद पोटदुखी निवारक, रक्तशुद्धीकारक, बलवर्धक, कृमिनाशक आम्लपित्तहारक, भूक उद्दीपित करणारी आहे. त्वचेचा रंग उजळतो. रक्तशुद्धीसाठी गुणकारी आहे. डाळीच्या पिठामध्ये थोडी हळद, थोडा पिसलेला कापूर व ४ ते ५ थेंब मोहरीचे तेल टाकून स्नान केल्यास त्वचारोग, खाज थांबून पूर्ण अंगकांती सुधारते. रोजच्या आहारात नियमितपणे वापर केल्याने शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. हळदीत नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेले कुरक्युमीन रसायन अत्यंत प्रभावी आणि गुणकारी असते. त्यामुळे आपल्या शरीरातील सूज कमी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. फायदे
हळद मिश्रित आरोग्यदायी दूध दूध पूर्णान्न आहे. त्यामुळे दुधात हळद मिसळल्यास आरोग्यास नक्कीच फायदा होतो. यास ‘गोल्डन मिल्क’ असे म्हणतात. याचे अनेक फायदे आहेत. गोल्डन मिल्कमध्ये हळद, आल्याची पूड, वेलची पूड मिसळतात. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हळदीचे दूध व इतर मसाल्यांचे पदार्थ मिसळून केलेला काढा अतिशय उपयुक्त आहे. साहित्य एक लिटर दूध, १० ग्रॅम हळद, १०० ग्रॅम सेंद्रिय गूळ पावडर, ५० ग्रॅम जेष्ठमध पावडर कृती
संपर्क : नेहा गोडसे, ९४२२११४१८६ अमृता राजोपाध्ये- कुलकर्णी, ७२१८३२७०१० (कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय, नारायणगाव, जि. पुणे)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.