दूध कंपन्यांच्या नफावाढीला बळ?

दुधाची मागणी कायम राहणार आहे. दुधासोबतच तूप, लोणी, चीज, दही, आईसक्रीम या दुग्धजन्य उत्पादनांनाही चांगली मागणी आहे. दुधाच्या मूल्यवर्धित उत्पादनांच्या (value-added products) किमती तुलनेने स्थिर आहेत. त्यांच्या विक्रीतील नफ्याचे प्रमाण ७ ते ९ टक्के आहे.
Milk
MilkAgrowon
Published on
Milk Products
Milk ProductsAgrowon

दुधाच्या विक्री दरात आणखी वाढ केली जाण्याची शक्यता नाही. वाढत्या उत्पादनखर्चामुळे संघटित क्षेत्रातील दूध व्यवसायातील नफ्याचे प्रमाण रोडावले होते. नुकत्याच केलेल्या विक्री दरातील वाढीमुळे ही घट रोखण्यास मदत होईल.

Milk Products
Milk ProductsAgrowon

दूध संकलन वाढल्यामुळे आणि निविष्ठांच्या किंमती नरमल्यामुळे आता नफ्याचे प्रमाण सुधारले आहे. त्यामुळे आता दुधाच्या विक्री दरात वाढ होण्याची शक्यता नाही, असे क्रिसिलच्या अहवालात म्हटले आहे.

Amul
Amul Agrowon

अमूल आणि मदर डेअरीने १७ ऑगस्टपासून देशांतर्गत बाजारातील किरकोळ दूध विक्रीचा दर २ रुपयांनी वाढवला आहे.

Mother Dairy
Mother DairyAgrowon

प्रमुख दूध उत्पादक राज्यांत पशुंना आजाराची लागण आणि पशुखाद्याचे दर वाढल्यामुळे संघटित संस्थाकडील दूध संकलन घटले होते. त्यामुळे मागच्या सहा महिन्यांत दूध खरेदी दरात ८ ते १० टक्क्यांची वाढ झाली. त्यातच इंधन दरवाढीमुळे पॅकेजिंग आणि वाहतूक खर्चातही वाढ झाली.

Milk Production
Milk ProductionAgrowon

परंतु यापुढे दुधाच्या किरकोळ विक्री दरात आणखी वाढ होण्याची शक्यता दिसत नाही. कारण दुध संकलनात होत असलेली अपेक्षित वाढ आणि निविष्ठांच्या नरमलेल्या किंमती यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या उत्तरार्धात दूध कंपन्यांच्या नफावाढीला बळ मिळेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com