उन्हाळ पिकांत मुगाला पसंती; बाजरी, उडदाचे क्षेत्रही वाढले

केंद्रीय कृषी मंत्रालयाने पुरवलेल्या आकडेवारीनुसार शुक्रवारपर्यंत (दिनांक १३ मे) ७३.५८ लाख हेक्टर क्षेत्रात उन्हाळ पिकांची लागवड करण्यात आली आहे.
Summer Crops
Summer CropsAgrowon
Published on
Summer Crops
Summer CropsAgrowon

उन्हाळ पिकांच्या लागवडीत यंदा शेतकऱ्यांनी तृणधान्य लागवडीस पसंती दिली असून त्यातही मुग लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत मका, भुईमूग आणि भातपिकाच्या लागवड क्षेत्रात घट झाली आहे.

Summer Crops
Summer CropsAgrowon

या उन्हाळ्यात एकूण तेलबिया लागवडीच्या क्षेत्रात ३.३ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी उन्हाळ्यात १०.६९ लाख हेक्टरवर तेलबियांची लागवड करण्यात आली होती. यंदा हे क्षेत्र ११.०४ लाख हेक्टरवर गेले आहे.

Summer Crops
Summer CropsAgrowon

या उन्हाळ्यात मूग लागवड क्षेत्रात २१.२ टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्यावर्षी शेतकऱ्यांनी याच कालावधीत शेतकऱ्यांनी १४.४३ लाख हेक्टर क्षेत्रात मुगाची लागवड केली होती. त्यातुलनेत यंदा शुक्रवारपर्यंत (दिनांक १३ मे) १७.४८ लाख हेक्टर क्षेत्रात मुगाची लागवड करण्यात आली आहे.

Summer Crops
Summer CropsAgrowon

गेल्या यावर्षीच्या तुलनेत यंदा एकूण उन्हाळ पिकांच्या लागवडीत ५.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. उडीद, मूग, तीळ आणि बाजरा लागवडीखालील क्षेत्र वाढले असून भुईमूग, मका, भातपिकाचे क्षेत्र घटले आहे.

Summer Crops
Summer CropsAgrowon

यंदा भात लागवडीचे क्षेत्र ३.८ टक्क्यांनी घटले असून गेल्यावर्षीच्या ३०.९६ लाख हेक्टरच्या तुलनेत यंदा २९.८० लाख हेक्टरवर भातपिकाची लागवड करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com