खाद्यसंकट टाळण्यासाठी बांगलादेशकडून तांदळाची खरेदी

बांगलादेश सरकारने प्रथमच सरकारी पातळीवरून (Government to Government- G2G) तांदूळ खरेदीचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेसारखे खाद्य संकट (Food Crisis) निर्माण होऊ नये या भीतीने बांगलादेश चढ्या दराने तांदूळ आयात करत आहे.
Rice
RiceAgrowon
Published on
Paddy Cultivation
Paddy CultivationAgrowon

बांगलादेश सरकारने भारताकडून एक लाख टन तांदूळ खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशात तांदळाचा तुटवडा पडला आहे.

Paddy Cultivation
Paddy CultivationAgrowon

तांदळाची देशांतर्गत गरज भागवण्यासाठी बांगलादेशची भारतावर भिस्त आहे. बांगलादेशकडून मागणी वाढल्यामुळे भारतीय तांदळाच्या किमती वाढल्या आहेत.

Paddy Cultivation
Paddy CultivationAgrowon

बांगलादेश सरकारने प्रथमच सरकारी पातळीवरून तांदूळ खरेदीचा निर्णय घेतला आहे. बांगलादेशच्या अन्न महामंडळाने भारत सरकारसोबत तांदूळ खरेदी करार केला आहे.

Paddy
Paddy Agrowon

या करारानुसार बांगलादेश सरकार ४२२ डॉलर प्रति टन दराने (वाहतूक खर्च वगळता) भारताकडून उकडा तांदूळ खरेदी करणार आहे. बांगलादेश सरकार भारताखेरीज दक्षिण-पूर्व आशियायी देशांतूनही तांदूळ खरेदी करणार आहे.

Paddy
Paddy Agrowon

यावर्षी बांगलादेशात प्रतिकूल हवामानामुळे भाताच्या पिकाला फटका बसला आहे. तिन्ही हंगामात तांदूळ उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेख हसीना सरकारने देशात तांदळाचा पुरेसा साठा करण्यासाठी कंबर कसली आहे.

Rice Stock
Rice StockAgrowon

अमेरिकेच्या कृषी विभागाच्या (USDA) मते बांगलादेश यावर्षी ६.५ लाख टन तांदूळ आयात करण्याची शक्यता आहे. अन्न सुरक्षेचा विचार करून बांगलादेश सरकारने तांदळावरील आयातशुल्क सध्याच्या २५ टक्क्यांवरून शून्य टक्क्यांवर आणण्याचा निर्णय घेतला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com