
महाबळेश्वर ः येथील डॉ. साबणे रोडचे (Dr. Sabane Road) मुख्य बाजारपेठ (Mahableshwar Main Market) सुशोभीकरण करताना व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नसून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या सूचनेनुसार दोन्ही बाजूच्या केवळ गटारावरील अतिक्रमणे (Encroachment) काढून ही जागा सुशोभीकरण करण्यात येणार आहे.
नवीन आराखड्याप्रमाणेच बाजारपेठेचे सुशोभीकरण (Market Development) करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी व्यापारी शिष्टमंडळाशी बोलताना स्पष्ट केले. या वेळी बाजारपेठेतील व्यापारी उपस्थित होते.
येथे गेल्या आठवड्यात विरोधी पक्षनेते अजित पवार येथे एक खासगी कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी महाबळेश्वर बाजारपेठेचे सुशोभीकरण हे जुन्या आराखड्याप्रमाणे करावे, यासाठी आपण मुंबई येथे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे व पालकमंत्री देसाई यांची भेट घेणार असल्याचे सांगितले होते.
त्यामुळे व्यापाऱ्यांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. याआधी जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीत महाबळेश्वर व तापोळा परिसरातील पर्यटन विकासाच्या अनुषंगाने विविध विकासकामांचा पालकमंत्री देसाई व खासदार डॉ. शिंदे यांनी आढावा घेताना येथील डॉ. साबणे रोड सुशोभीकरणासाठी दोन्ही बाजूंच्या गटारांवरील अतिक्रमण काढून ती जागा सुशोभीकरणासाठी अंतिम करावी, असा निर्णय घेतला होता.
या वेळी डॉ. शिंदे यांनीही महाबळेश्वर येथील डॉ. साबणे रोड सुशोभीकरणाचा आराखडा चांगल्या पद्धतीने तयार करावा, अशा सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या होत्या.
मुख्यमंत्री शिंदे, पालकमंत्री देसाई व डॉ. शिंदे यांनी घेतलेल्या या निर्णयाचे व्यापारी वर्गाने स्वागत केले होते.
त्यामुळे एकीकडे अशा पद्धतीने नवीन आराखडा तयार करण्याबाबतचा निर्णय झाला असताना पुन्हा एकदा जुना आराखड्याबाबतचा विषय पुढे येत असल्याने बाजारपेठेतील व्यापारी वर्गामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
डॉ. साबणे रोडचे सुशोभीकरण जुन्या आराखड्याप्रमाणे करावे व रस्ता रुंद करावा, अशी मागणी बाजारपेठेशी कोणताही संबंध नसलेल्या एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याने करीत उपोषणाचा इशारा दिला होता.
या पदाधिकाऱ्याला मुख्य बाजारपेठेच्या रुंदीकरणाबाबत मंजूर विकास आराखड्याप्रमाणे विकासकामाबाबत कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी स्पष्टीकरण पालिकेच्या वतीने देण्यात आले.
कामे योग्य पद्धतीने व दर्जेदार होत नसल्याची तक्रार करण्यासाठी येथील नागरिक गेले होते. याचबरोबर कामांवर देखरेख करण्यासाठी योग्य यंत्रणा नसल्याची तक्रार नागरिक करीत होते.
या सर्व घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे आज पालकमंत्री देसाई येथे आले असता बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन आपल्या व्यथा मांडल्या.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.