
एकोपा, टपरीमुक्त अभियान, ग्रामस्वच्छता, बचत गट चळवळ, वृक्ष लागवड, जलसंधारण आदी विविध उपक्रमांमधून आव्हाणे बुद्रुक (जि. नगर) गावाने कृतिशील व विधायक गाव अशी ओळख निर्माण केली आहे. श्री गणेशाची स्वयंभू निद्रिस्त मूर्ती असलेले वैशिष्ट्यपूर्ण मंदिर असल्याने गावाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. नगर जिल्ह्यातील शेवगाव हा दुष्काळी तालुका म्हणून परिचित आहे. तालुक्यातील काही गावांनी लोकसहभागातून विविध उपक्रम राबवून विकासाला दिशा दिली. सव्वातीन हजार लोकसंख्येचे आव्हाणे बुद्रुक हे त्यातीलच उपक्रमशील गाव आहे. येथे लोकनियुक्त सरपंचांसह ११ ग्रामपंचायत सदस्य आहेत. ग्रामस्थांसह माजी सरपंच संजय कोळगे, विद्यमान लोकनियुक्त सरपंच संगीता प्रतापराव कोळगे, उपसरपंच फातीमाबी गुलाब पठाण, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक के. डी. अकोलकर यांचे योगदान गावाला लाभले आहे, तर ज्येष्ठ नागरिक वसंतदेवा भालेराव, रामदास पाटील कोळगे, कांता मुटकुळे, मोहनराव कोळगे, बापूसाहेब महाजन यांचे मार्गदर्शन लाभले आहे. टपरीमुक्त अभियान गावात विविध साहित्य विक्रीच्या ७५ पर्यंत टपऱ्या होत्या. त्यातून शाश्वत उत्पन्न, रोजगाराची हमी नाही. त्यामुळे तरुणांना रोजगार, व्यवसायासाठी हक्काची जागा आणि ग्रामपंचायतीलाही उत्पन्न मिळावे यासाठी माजी सरपंच संजय कोळगे यांनी पुढाकार घेतला. त्यातून टपरीमुक्त गाव अभियान उपक्रम राबवला. माजी आमदार नरेंद्र घुले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले व पंचायत समितीचे सभापती क्षितीज घुले यांनीही उपक्रमाला हातभार लावला. आता ग्रामपंचायतीद्वारे ४४ व्यावसायिक गाळे बांधून टपरीचालक तरुणांना ते माफक दरात उपलब्ध करून दिले जात आहेत. व्यसनमुक्त अभियानही यशस्वी करण्यासाठी गावकऱ्यांची धडपड सुरू आहे. पाणीपातळीत वाढ शिवारातील नदीवर पंचवीस वर्षांपूर्वीचे दोन बंधारे आहेत तीन वर्षांपूर्वी लोकसहभागातून दोन्ही बंधाऱ्यातील गाळ काढला. तो शेतांत पसरल्याने शेती सुपीक झाली. पाणी साठवण क्षमता वाढली. दोन वर्षांपासून भागात मुबलक पाऊस होत असल्याने शिवारातील पाणीपातळी वाढली. शेजारील आव्हाणे खुर्द गावशिवारालाही या कामाचा फायदा झाला. पूर्वी हंगामी अन्नधान्य व भुसारी पिके होत. आता उसासह फळबागा, कांद्याचे क्षेत्र वाढले आहे. आव्हाणे खुर्दचे लागवड क्षेत्र १३५८ एकर असून त्यातील ७९८ हेक्टरवर ऊस आहे. दोन हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कांदा आहे. गावातील ठळक उपक्रम
निद्रिस्त गणपतीचे एकमेव मंदिर गावात निद्रिस्त अवस्थेतील स्वयंभू गणपतीचे असलेले मंदिर भारतातील एकमेव असावे. तीर्थक्षेत्र क वर्गात समाविष्ट असलेले हे देवस्थान सर्वदूर प्रसिद्ध आहे. लोकवर्गणी व सरकारी निधीतून मंदिराचा विकास झाला आहे. मंदिराचे पुजारी वसंत पुरुषोत्तम भालेराव म्हणाले, की पूर्वी गावातील दादोबा देव गोसावी मोरगावच्या गणपतीला दर चतुर्थीला जात. एकदा पावसाळ्यात मोरगावजवळील कऱ्हा नदीला पाणी आल्याने ते अडकून पडले. लोकांनी त्यांची सुटका केली. पुढे गावातील शेतात नांगरट सुरू असताना निद्रिस्त गणेशाची मूर्ती आढळली. तेथेच मूर्तीची प्रतिष्ठापणा करून हेमाडपंथी मंदिर व परिसर विकास झाला. गणेश जयंतीनंतर येणाऱ्या चतुर्थीला मोठी यात्रा भरते. आव्हाणे बुद्रुकचा गौरव
संपर्क- संजय कोळगे, ९४२१५५५९०६, ८८३०९७७६७३ (माजी सरपंच)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.