

गावांच्या भौतिक विकासाच्या सार्वजनिक योजना आणि मानव विकासाच्या शाश्वत ग्राम विकासास सहाय्यभूत ठरणाऱ्या योजना व उपक्रम, प्रकल्प यांचा समावेश असणारा आराखडा म्हणजे ग्रामविकासाचा संपूर्ण आराखडा. शाश्वत विकास आणि त्याचा ग्रामविकासाशी असणारा संबंधाबाबतच्या प्रश्नांचा विचार आजच्या लेखात करत आहोत. ग्राम विकासामध्ये शाश्वत विकास हा शब्द सातत्याने वापरला जातो. अगदी जागतिक पातळीपासून ते ग्रामपंचायतींचा विकास आराखडा करण्यापर्यंत या शब्दाचा वापर करण्यात येतो. मात्र शाश्वत विकास म्हणजे काय? त्याचा नेमका अर्थ काय? जगात, राष्ट्रीय पातळीवर, राज्याच्या संदर्भात तसेच जिल्हा, तालुका व गावांच्या पातळीवर शाश्वत विकास करायचा म्हणजे काय करायचे ? शाश्वत विकास ध्येय लक्षात घेऊन ग्रामविकास आराखडा तयार करावा असे शासन निर्णयात आदेश दिले आहेत. शाश्वत विकास म्हणजे काय?
आराखडा तयार करताना शाश्वत विकासाचा विचार कसा करावा?
शाश्वत विकासाची काही ध्येय आहेत काय? त्याची सुरवात केव्हा झाली? संयुक्त राष्ट्रसंघाने आपल्या सभासद राष्ट्रांसाठी ‘शाश्वत विकास ध्येये २०३०‘ असा एक आराखडा सप्टेंबर २०१५ मध्ये तयार केला. त्यामध्ये जगातल्या सर्वच देशांनी शाश्वत विकासाची एकूण १७ ध्येय २०३० पर्यंत पूर्ण करायची आहेत असे ठरविण्यात आले आहे. शाश्वत विकासाची ही सतरा ध्येये कोणती आहेत? दारिद्र निर्मूलन, भूकमुक्त समाज, चांगले आरोग्य व स्वास्थ्य गुणवत्तापूर्ण शिक्षण, लिंगभाव समानता, स्वच्छ व सुरक्षित पाणी, परवडणारी व हरित ऊर्जा (सौर, पवन, जैव), रोजगार व आर्थिक प्रगती, उद्योग, संरचना, विषमता कमी करणे, शाश्वत शहरे व समाज, वातावरण बदलावर कृती, पाण्याखालील जीवन सुरक्षा, जमिनीवरील जीवन सुरक्षा, न्याय व शांतता, सर्वसमावेशक विकास व त्यासाठी संस्थात्मक भागीदारी, अशी ध्येये ठरविण्यात आली आहेत. गावपातळीवर ही ध्येये साध्य करण्यासाठी काय करायला हवे?
ग्रामविकास संपूर्ण आराखडा कसा तयार करावा? ग्रामपंचायतीस सर्व मार्गांनी मिळणारे उत्पन्न, स्वनिधी व शासनाच्या वेगवेगळ्या खात्यांकडून वेगवेगळ्या योजनांमधून प्राप्त होणारा निधी, गावास मिळणारी बक्षिसे, लोकवर्गणी, उद्योगांकडील सामाजिक जबाबदारी (सीएसआर) निधी या सर्वांचा विचार करून त्यावर आधारित गावांच्या भौतिक विकासाच्या सार्वजनिक योजना आणि मानव विकासाच्या शाश्वत ग्राम विकासास सहाय्यभूत ठरणाऱ्या योजना व उपक्रम, प्रकल्प यांचा समावेश असणारा आराखडा म्हणजे ग्रामविकासाचा संपूर्ण आराखडा होय. वित्त आयोगाच्या निधीशिवाय ग्रामविकासासाठी कोणत्या शासकीय विभागाकडून निधी मिळू शकते?
संपर्क - डॉ. कैलास बवले, ८८८८८९२७५७ (समन्वयक, डॉ. धनंजयराव गाडगीळ शाश्वत ग्रामविकास केंद्र, गोखले अर्थशास्त्र संस्था, पुणे)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.