निर्यातक्षम भेंडी उत्पादनासाठी कीड नियंत्रण

निर्यातक्षम भेंडीची गुणवत्ता व उत्पादकता कायम ठेवताना पीक संरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. रासायनिक कीडनाशकांचे अवशेष ही देखील समस्या असते. त्यादृष्टीने एकात्मिक पद्धतीने किडींचे नियंत्रण महत्त्वाचे ठरते.
 निर्यातक्षम भेंडी उत्पादनासाठी कीड नियंत्रण
निर्यातक्षम भेंडी उत्पादनासाठी कीड नियंत्रण

निर्यातक्षम भेंडीची गुणवत्ता व उत्पादकता कायम ठेवताना पीक संरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. रासायनिक कीडनाशकांचे अवशेष ही देखील समस्या असते. त्यादृष्टीने एकात्मिक पद्धतीने किडींचे नियंत्रण महत्त्वाचे ठरते. निर्यातीच्या दृष्टीने भेंडी पिकाचे महत्त्व वाढले आहे. देशात सुमारे ४.३० दशलक्ष हेक्टर क्षेत्रावर हे पीक घेतले जाते. एकूण क्षेत्राच्या मानाने उत्पादन क्षमता मात्र कमी आहे. उत्पादकता कमी असण्याच्या कारणांमध्ये किडींचा प्रादुर्भाव हे एक कारण आहे. उगवणी ते काढणी दरम्यान पिकावर विविध किडींचा प्रादुर्भाव होतो. सुमारे १० ते १२ फवारण्या करणे खर्चिक ठरणारे असते. कीडनाशकांचे अवशेष हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासाठी एकात्मिक कीड नियंत्रण व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे. या पिकातील महत्त्वाच्या किडी पुढीलप्रमाणे. तुडतुडे

 • भेंडीवरील प्रमुख कीड. पानाच्या मध्य शिरेत पानांच्या खालील बाजूस अंडी घालते.
 • -पिल्ले व प्रौढ सहसा पानाच्या खालील पृष्ठभागावर राहून पेशींमधील रस शोषतात.
 • प्रादुर्भावग्रस्त पाने पिवळसर आणि चुरडल्यासारखी वाटतात.
 • प्रादुर्भाव मोठया प्रमाणात असेल तर पाने विटकरी, लाल रंगाची, कडक आणि चुरडल्यासारखी दिसतात.
 • आर्थिक नुकसान संकेत पातळी- ५ तुडतुडे प्रति झाड
 • मावा

 • पिल्ले तसेच प्रौढ पिकांच्या कोवळ्या भागांवर समुहाने राहतात.
 • पानातून तसेच कोवळ्या भागांतून रस शोषतात.
 • शरीरातून मधासारखा गोड चिकट पदार्थ पानावर सोडते. त्यामुळे त्यावर काळया बुरशीची वाढ होते व झाडाच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो.
 • कीड विषाणू रोगाचा प्रसार करते. कोरड्या वातावरणात उद्रेक होतो.
 • फुलकिडे

 • भेंडी पिकातील प्रमुख कीड
 • अंडी पानाच्या तंतूमध्ये घालते. पिल्ले व पूर्ण वाढ झालेले प्रौढ फुलकिड्याप्रमाणेच दिसतात मात्र
 • त्यांना पंख नसतात.
 • सहसा पूर्ण वाढ झालेल्या पानांवर उपजीविका करतात.
 • जमिनीत पालापाचोळयामध्ये कोषावस्था.
 •  प्रौढ फिकट पिवळसर. अंगावर काळे केस.
 • पंखापासून ते शरीराच्या टोकापर्यंत काळी रेषा.
 • पंखांची रचना बिजागिरीने जोडल्यासारखी.
 • पिल्ले व प्रौढ झाडाच्या कोवळया पेशी विशेषतः: फुले खरवडतात. त्यातून येणारा द्रव शोषतात.
 • परिणामी फुले वाळतात व गळून जातात. त्याचा फळधारणेवर विपरीत होतो.
 • शेंडे व फळ पोखरणारी अळी

 • मादी पानांवर एकेक अंडे घालते. अंडी निळसर रंगाची.
 • कीड वर्षभर कार्यक्षम. जास्त आर्द्रता व जास्त उष्णता पोषक
 • उन्हाळयात प्रादुर्भाव मोठया प्रमाणात.
 • सुरवातीच्या काळात अळी अंड्यातून बाहेर निघाल्यानंतर कोवळ्या शेंडयाला पोखरते. आत भुयार तयार करते. प्रादुर्भावग्रस्त पोंगा मलूल
 • होतो. खालच्या दिशेने लोंबतो व नंतर वाळतो.
 • कळया येण्यास सुरवात झाल्यानंतर अळी कळया, फुले व फळात शिरून पेशी खाते. पोखरलेल्या कळया व फुले वाळतात. खाली पडतात. फळे विकृत आकाराची होतात. वाढ थांबते.
 • फळ पोखरणारी अळी

 • बहुभक्षी कीड. मादी झाडाच्या कोवळ्या फांदया, पाने, कळयांवर पिवळसर अंडी घालते.
 • अंगावर चमकदार केस.
 • कोषावस्था जमिनीत. अळी विविध रंगाची. शरीराच्या दोन्ही बाजूने गडद पट्टा व तुरळक केस
 • फळांना अनियमित आकाराची मोठी छिद्रे पाडून आतील भाग खाते. त्यावेळी अर्धे शरीर आत आणि अर्धे बाहेर असते.
 • लाल कोळी

 • पिल्ले लालसर- हिरवी. प्रौढ तपकिरी
 • सोंडेने पानातील रस शोषतात. कोळी जाळे विणतो. ते पानाच्या खालील बाजूस आढळते.
 • प्रादुर्भाव पानाच्या देठाभोवती, मुख्य शिरेच्या आजूबाजूस व पाने मुडपण्याच्या ठिकाणी एकवटलेला.
 • पांढरी माशी:-

 • प्रौढ फिकट पिवळसर. अंगावर मेणचट आवरण
 • मादी तंतूमय देठावर पानाच्या खालील बाजूला अंडी घालते.
 • पिल्ले व प्रौढ पानाच्या खालील बाजूला राहून रस शोषतात.
 • भेंडीवरील यलो व्हेन मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रसार करते.
 • पाने खाणारा भुंगेरा

 • अळी पिवळसर. प्रौढ तपकिरी. अंगावर काळे ठिपके.
 • अंडी पिवळसर. सिगारेटच्या आकाराची व पुंजक्यामध्ये.
 • अळी व प्रौढ पाने खरडवतात. हिरवा गाभा खातात. पानांवर वाळल्याप्रमाणे चट्टे पडतात.
 • कीड सर्वेक्षण

 • उगवल्यापासून ते काढणीपर्यंत दर आठवडयाला कामगंध सापळे, चिकट
 • सापळे यांच्या साह्याने पिकाचे निरीक्षण करावे.
 • नागमोडी पद्धतीने हेक्टरी २५० झाडांचे निरीक्षण नोंदवावे.
 • ९५ टक्के झाड प्रादुर्भाव विरहित आढळल्यास या क्षेत्रावरील भेंडी निर्यातीसाठी काढणीसाठी योग्य असल्याचे समजावे.
 • नियंत्रण

 • पीक अवशेष, काडीकचरा, धसकटे वेचून नष्ट करावीत.
 • उन्हाळ्यात खोल नांगरट
 • फेरपालट करावी. भेंडी कुळातील कापूस, जास्वंद यांची लागवड भेंडीच्या शेतात किंवा जवळपास करू नये.
 • कृषी विदयापीठांकडील शिफारसीत किडींस प्रतिकारक वाणांचा वापर.
 • सुत्रकृमींचा प्रादुर्भाव असलेल्या क्षेत्रात निंबोळी पेंड २५० किलो प्रति हेक्टर प्रमाणे मातीत मिसळून दयावी.
 • लागवडीनंतर २५ ते ३० दिवसांनी तण काढावे व पिकास भर दयावी.
 • पिकाच्या पूर्ण कालावधी दरम्यान शेत तणमुक्त ठेवावे.
 • पांढरी माशीचे स्थलांतर रोखण्यासाठी ज्वारी, बाजरी, मका या सारख्या
 • उंच पिकांची लागवड भेंडीच्या शेताभोवती करावी.
 • फळ पोखरणारी अळी, हेलिकोव्हर्पा, शेंडा व फळ पोखरणारी अळी, इरीयास यांच्या नियंत्रणासाठी १० ते १२ कामगंध सापळे प्रति हेक्टर या प्रमाणात शेंडयापासून एक फूट उंचीवर काठीच्या साहाय्याने उभारावेत.
 • दोन कामगंध सापळयांमधील अंतर २५ ते ३० मीटर असावे. दर ३० ते ६० दिवसांनी सापळयांमधील ल्यूर बदलावे.
 • फुलकिडे, पांढरी माशी, तुडतुडे व मावा यांच्यासाठी पिवळया किंवा निळया चिकट सापळयांचा हेक्टरी २५ ते ५० प्रमाणे वापर करावा. सापळे पिकाच्या उंचीच्या १५ सेंमी उंचीवर लावावेत.
 • किडींचे सर्वेक्षण व नियंत्रणसाठी हेक्टरी एक प्रमाणे प्रकाश सापळयाचा वापर करावा.
 • सापळे संध्याकाळी लावावेत. दोन ते तीन तास सुरू ठेवावेत.
 • प्रादुर्भावग्रस्त झाडांचे शेंडे, कीडग्रस्त फळे, अळया, भुंगेरे गोळा करुन नष्ट करावेत.
 • मित्रकोळी, मित्रकिटकांमध्ये लेडीबर्ड, भुंगेरे, सिरफिड माशी, क्रायसोपर्ला, प्रार्थना किटक, गांधील माशी, चतुर आदीच्या संवर्धनासाठी लेबल क्लेम असलेल्या रासायनिक कीटकनाशकांचा वापर संयमित प्रमाणात करावा.
 • वनस्पतिजन्य किंवा जैविक कीटकनाशके किंवा मित्र जिवाणू वा बुरशीयुक्त कीडनाशकां वापर करावा.
 • ट्रायकोग्रामा, एनकार्सिया, ब्रेक्रॉन, कॅंपोलसिटीस क्लोरीडी आदी मित्रकिटकांचा वापर उपलब्धतेनुसार करावा.
 • शेतात पक्षीथांबे उभारावेत.
 • फळ पोखरणारी अळी, हेलिकोव्हर्पा आर्मिजेरा, पाने खाणारी अळी, स्पोडोप्टेरा लिट्युरा यांच्या नियंत्रणासाठी हेक्टरी २५० मिली प्रमाणे फवारणी करावी. बिव्हेरिया बॅसियाना (एक टक्के)
 • भुकटी १० ग्रॅम प्रति लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी.
 • Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

  ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

  Related Stories

  No stories found.
  document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
  Agrowon
  agrowon.esakal.com