लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो. त्यापैकी (पावसाळ्यात) जून-जुलै महिन्यांमध्ये येणाऱ्या बहारास मृग बहार आणि ऑक्टोबर महिन्यांमध्ये हस्त नक्षत्रात येणाऱ्या बहारास हस्त बहार तर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये म्हणजे थंडी संपतेवेळी येणाऱ्या बहरास आंबे बहार म्हणतात. यातील आंबिया बहार नैसर्गिकरित्या येत असल्याने बऱ्याच शेतकऱ्यांचा कल हा आंबिया बहार घेण्याकडे असतो. सध्यस्थितीत पावसाची रिमझिम, अपुरा सूर्यप्रकाश, थंड हवा, आर्द्रता, कमी तापमान व शेतातील जमीन संपृक्त झाल्याने आंबिया बहारच्या फळांवर फायटोफ्थोरा बुरशीचा प्रादुर्भाव होऊन पाने काळी पडणे, पानगळ होणे व फळांवर तपकिरी डाग पडणे अशा विकृती दिसून येत आहेत. पानावरील चट्टे लक्षणे : पावसाळ्यात जमिनीलगतच्या फांद्यावरील पाने व फळांना ह्या बुरशीचा प्रादुर्भाव सर्वप्रथम होतो. यामुळे पाने टोकाकडून करपल्यासारखी व मलूल होतात. अशी पाने हातात घेऊन चुरा केल्यास त्यांची घडी होते, मात्र पाने फाटत नाहीत. टोकाकडून झालेले संक्रमण पूर्ण पानावर होऊन पाने तपकीरी काळे होतात. नंतर अशी पाने गळून झाडाखाली त्यांचा खच पडतो. फांद्या पर्णविरहित खराट्याप्रमाणे दिसतात. परिणामी अकाली फळगळ होते. पानावरील चट्टे संक्रमण रोपवाटिकेमधील कलम तसेच नुकतेच लागवड केलेल्या कलमांवरसुद्धा दिसून येतात. फळावरील तपकिरी रॉट किंवां फळावरील कूज लक्षणे : पानांवर प्रादुर्भाव झाल्यानंतर जमिनीलगतच्या हिरव्या फळांवर तपकिरी किंवा रडया डागांची सुरवात होते. फळे एकाबाजूने करपण्यास सुरवात होते. फळाच्या हिरव्या सालीवर संक्रमण होऊन पूर्ण फळ हे तपकिरी काळ्या रंगाचे होते. अशी फळे सडून गळतात. या फळ सडीच्या अवस्थेस 'ब्राऊन रॉट' किवां तपकिरी कुज असे म्हणतात. फळे खाली पडल्यानंतर फळांच्या पृष्ठभागावर पांढऱ्या बुरशीची वाढ दिसून येते. तोडणीवेळी करड्या रंगाची फळे निरोगी फळासोबत मिसळल्यास निरोगी फळे पण सडतात. प्रसारासाठी अनुकूल हवामान :
व्यवस्थापन :
डॉ. दिनेश ह. पैठणकर, ९८८१०२१२२२ (अखिल भारतीय समन्वयीत संशोधन प्रकल्प (फळे), डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.