पुणे जिल्ह्यातील बिरोबावाडी येथील केशव होले या उच्चशिक्षित युवा शेतकऱ्याने खरबूज आणि कलिंगड यांनाच बारा वर्षांपासून मुख्य पिके बनवली आहेत. सहा एकरांत आधुनिक तंत्रांचा वापर करीत या पिकांचे उत्कृष्ट उत्पादन घेताना त्यांना सक्षम बाजारपेठही देण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. या दोन्ही पिकांत होले यांनी ‘मास्टरकी’ मिळवली आहे. पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बिरोबावाडी येथील केशव बबनराव होले हा उच्चशिक्षित युवा शेतकरी आहे. सध्या पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शिक्षणशास्त्र विषयात होले एमफिल करीत आहेत. शिक्षण क्षेत्राबरोबरच शेतीतही चांगले करिअर करण्याकडे त्यांचा अोढा आहे.
अशी आहे होले यांची शेती होले यांची वडिलोपार्जित आठ एकर शेती आहे. शेताजवळून खडकवासला धरणाचा कॅनाॅल जात असल्याने पाण्याची चांगली उपलब्धता आहे. पूर्वी हे कुटूंब ऊस, भाजीपाला अशी विविध पिके घेत होते. परंतु नफा आणि खर्च यांचा ताळमेळ बसत नसल्याने त्यांनी पर्यायी पिकांचा शोध सुरू केला. त्यादृष्टीने सन २००६ पासून खरबूज व कलिंगड या पिकांची लागवड करण्यास सुरवात केली. आजगायत या पिकांत सातत्य ठेवले आहे.
पीक पद्धती
काढणी
विक्री व्यवस्थापन पुणे व मुख्यतः वाशी- मुंबई येथे शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री फरगडे फार्मर इंडिया प्रोड्यूसर कंपनी, वरवंड यांच्यामार्फत यंदा केली. गुजरातमधील व्यापाऱ्यालाही यंदा जागेवर माल दिला.
आलेले अनुभव कमी कालावधीत दोन्ही फळपिकांमधून चांगले उत्पन्न मिळवण्याची संधी झेंडूचा बेवड या फळपिकांसाठी चांगला. झेंडूंमुळे सूत्रकृमीदेखील रोखले जातात. शेतकऱ्यांच्या भेटी मावळ, गडचिरोली, मोहोळ, मंगळवेढा, श्रीगोंदा, शिरूर, शेवगाव, जळगाव, गुजरात, राज्यस्थान येथील शेतकऱ्यांनी शेतास भेटी दिल्या आहेत.
पुरस्कार महात्मा फुले शिक्षणगौरव सहकार महर्षी अण्णासाहेब पी.के.पाटील कृषिसेवक ‘आत्मा’ पुणे उत्कृष्ट शेतकरी मधुसंदेश उत्कृष्ट शेतकरी-बारामती कृषी विज्ञान केंद्र उत्पादन (प्रातिनिधिक)
वर्ष | क्षेत्र | उत्पादन | |
खरबूज | २०१७ | २.५ एकर | ४२ टन |
२०१८ | २.५ एकर | ५५ टन | |
कलिंगड | दरवर्षी | एकरी | २० टन |
यंदा | २ एकर | आत्तापर्यंत २० टन |
संपर्क : केशव होले, ९९७५५४१२७२, ७०५७७९१२७२
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.